Home /News /mumbai /

Weather Update : या जिल्ह्यांमध्ये 5 जुलैपर्यंत अति मुसळधार, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्टचा इशारा

Weather Update : या जिल्ह्यांमध्ये 5 जुलैपर्यंत अति मुसळधार, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्टचा इशारा

मुंबईत मागील 24 तासांत सरासरी 175 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

    मुंबई, 1 जुलै : मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain in Maharashtra) झाला. तर याबरोबरच राज्यात सर्वत्र दिवसभर पावसाची बॅटिंग सुरू असल्यामुळे अनेक शहरांमध्ये पाणी साचले. याता आता पुन्हा आता हवामान खात्याकडून (IMD) जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याचा इशारा काय -  भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांच्याकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार 1 जुलै ते 5 जुलै 2022 या कालावधीत रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मागील 24 तासात कुलाबा वेधशाळेत 227 आणि सांताक्रूझ वेधशाळेत 175 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. मात्र, याबरोबरच हवामान खात्याने पावसासंदर्भात ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. पर्यटकांची मरिन ड्राईव्हवर गर्दी - मुंबईत मागील 24 तासांत सरासरी 175 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दुपारी दीड वाजेनंतर भरती काळात 4.25 मीटर पर्यंत उंच लाटा समुद्रात उसळल्या. त्यामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले. तर दुसरीकडे मुंबईतील पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी मरिन ड्राईव्हवर गर्दी केली होती. हेही वाचा - बापरे बाप! आकाशातून झाडावर कोसळला 'आगीचा गोळा'; कॅमेऱ्यात कैद झालं भयावह दृश्य; पाहा VIDEO दरम्यान, आज सकाळपासूनही मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने मुंबई आणि कोकण विभागाला ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. दरम्यान, राज्यात कोकणात, सांगली, सातारा, नाशिक या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. मात्र, पुण्यात अद्यापही मनासारखा पाऊस झाला नाही. येथील शेतकऱ्यांना पावसाची अपेक्षा आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IMD FORECAST, Rain updates, Ratnagiri

    पुढील बातम्या