Home /News /mumbai /

Rain in Maharashtra : आताच प्लान करा रविवारची सहल; या प्रसिद्ध ठिकाणी पावसाचं धुमशान, हवामान विभागाची माहिती

Rain in Maharashtra : आताच प्लान करा रविवारची सहल; या प्रसिद्ध ठिकाणी पावसाचं धुमशान, हवामान विभागाची माहिती

मध्य महाराष्ट्रातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा, हवामान खात्याने दिला आहे.

    मुंबई, 25 जून : हवामान खात्याकडून राज्यात पुढील पाच दिवस पाऊस होणार, असा इशारा देण्यात आला आहे. (Rain in Maharashtra) हवामान खात्याचे म्हणणे आहे की, अनेक ठिकाणी चांगला पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain Maharashtra) पडणार असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना काही सुचनाही हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. (IMD on Maharashtra Weather) हवामान खात्याचा इशारा - हवामान खात्याकडून दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा, हवामान खात्याने दिला आहे. पुढील पाच दिवस पाऊस राहील, असे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडावे, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच हवामान खात्याने नाशिक, सातारा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या काही भागांवर किनारपट्टीवर मध्यम ते तीव्र स्वरुपाचा पाऊस होणार आहे, असे म्हटले आहे. तर औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली इथे सध्या जोरदार पाऊस सुरू आहे, अशात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. हेही वाचा - मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना धक्का; एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं दरम्यान, दक्षिण कोकणमध्ये मुसळधार पाऊस तर उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. तर उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IMD FORECAST, Rain updates, Weather forecast

    पुढील बातम्या