मुंबईत पावसाचं धुमशान, पण मुंबई सुरू

मुंबईत पावसाचं धुमशान, पण मुंबई सुरू

मुंबईला पावसानं अक्षरक्षः झोडपून काढलं. गेल्या 24 तासांपासून मुंबईत पावसाचं धूमशान सुरू आहे. पण या पावसातही मुंबई कुठंच तुंबली नाही. मुंबईच्या वेगाला या पावसानं ब्रेक लावला होता.

  • Share this:

मुंबई,20 सप्टेंबर: मुंबईला पावसानं अक्षरक्षः झोडपून काढलं. गेल्या 24 तासांपासून मुंबईत पावसाचं धुमशान सुरू आहे. पण या पावसातही मुंबई कुठंच तुंबली नाही. मुंबईच्या वेगाला या पावसानं ब्रेक लावला होता. सकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं होतं. शिवाय रेल्वेची वाहतूकही मंदगतीनं सुरू होती. पण 29 ऑगस्टचा अनुभव पाहता बहुतांश मुंबईकरांनी घरात राहणंचं पसंत केलं.

याच दरम्यान व्हॉट्सअॅपवर पावसाबाबत अफवा पसरवल्या जात होत्या. या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन हवामान खात्यानं केलं.

हौशी मुंबईकर मात्र मरिन ड्राईव्हवर जाऊन पावसाचा आनंद लुटत होते.

आज पाऊस तुफान झाला. पण मुंबई कुठंही तुंबली नाही ही मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक गोष्ट ठरलीये.

First published: September 20, 2017, 8:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading