मुंबईत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी

मुंबईत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी

मुंबईच्या दादर, लालबाग, परळ, वरळी, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, दहिसरमध्ये पावसाच्या जोरदार सरी सुरू आहेत. तसेच मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू

  • Share this:

मुंबई, 08 जुलै: मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर वाढतच जात आहे. जोरदार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांत पाणी साचायला सुरूवात झाली असून रस्त्यांवरची वाहतूक संथगतीनं सुरू आहे. मुंबईच्या दादर, लालबाग, परळ, वरळी, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, दहिसरमध्ये पावसाच्या जोरदार सरी सुरू आहेत. मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. मेट्रोच्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे स्टेशन परिसरातही पाणी साचायला सुरूवात झाली आहे. गरज असल्यासच घराबाहेर पडण्याचा इशारा नागरिकांना देण्यात आला आहे. घाटकोपर मध्ये पूर्व- पश्चिमेला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. रेल्वे पूल वाकला असल्याची शंका असल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून हा पूल बंद केला आहे.

हेही वाचा: डोंबिवली स्टेशन झालं जलमय!

उपनगरांप्रमाणेच दक्षिण मुंबईतही पावसाची संतत धार सुरू आहे. हिंदमाता, सायनसारख्या सखल भागांत पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला असून मध्य रेल्वेची वाहतुक 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहे. रविवार असल्याने प्रवाशांची संख्यां जरी कमी असली तरी एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे मेगाब्लॉक यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने आजचा मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द केला आहे. ठाण्यात भिवंडी, मुरबाड, मुंब्रा, उल्हासनगर येथील सखल भागांत पाणी साचल्याने अनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले होते. जोरदार पावसामुळे असल्फा परिसरात पाणी साचलं आहे.

हेही वाचा: उल्हास नदीनं गाठली धोक्याची पातळी

उल्हासनगर, कल्याण, भिवंडी, ठाणे, मुंब्रा, दिवा परिसरांतील ठिकठिकाणच्या चाळीतील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे रहिवाशांचे हाल झाले. वासिंद परिसरातील ४२ गावांचा ठिकठिकाणच्या नदीनाल्यांच्या पुरामुळे संपर्क तुटला आहे.मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी लोक अडकून पडले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली आहे. रात्रीपासून 205 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महाड बाजारपेठेतही पाणी शिरलं असून दुकानांना त्याचा फटका बसलाय. गांधारी आणि जगबुडी या दोनही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यानं पुराचा जास्त फटका बसलाय. कोल्हापूर पंचगंगा नदीवरचा घाट पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांनी या पाण्यामध्ये उतरू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

हेही वाचा: सनी लिओनच्या बायोपिकचा ट्रेलर पाहिलात का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2018 09:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading