Elec-widget

मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस,राज्यातही संततधार

मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस,राज्यातही संततधार

या पावसाचा मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मात्र विशेष परिणाम झालेला नाही.

  • Share this:

17 जुलै : मुंबई आणि उपनगरात सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय. सकाळपासूनच शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळतायत. या पावसाचा मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मात्र विशेष परिणाम झालेला नाही. दरम्यान ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम आहे.

कर्जत तालुक्यात पावसाची संततधार सुरूच आहे. पालघरमध्येही रात्रभर पाऊस रिपरिप सुरू आहे. विक्रमगड तालुक्यातील धामणी धारण 77% भरलंय. या धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले असून 5100 क्युसेस पाण्याचा विसर्ग चालू आहे. 5 दारावाजांपैकी 3 दरवाजे दीड फुटांनी तर दोन दरवाजे एक फुटांनी उघडण्यात आलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2017 11:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com