Home /News /mumbai /

Maharashtra Rain Update : राज्यातील या भागात अलर्ट, पुढचे 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Rain Update : राज्यातील या भागात अलर्ट, पुढचे 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात विविध ठिकाणी होत असलेल्या जोरदार पावसादरम्यान हवामान खात्याने आणखी एक इशारा दिला आहे.

    मुंबई, 6 जुलै : राज्यात सध्या विविध ठिकाणी जोरदार (Maharashtra Rain) पाऊस होत आहे. सातारा, सांगली कोल्हापूर, मुंबई यासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain in Maharashtra) झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यातच आता हवामान खात्याने (IMD on Maharashtra Rain) आणखी इशारा दिला आहे. हवामान खात्याचा इशारा काय - राज्यात विविध ठिकाणी होत असलेल्या जोरदार पावसादरम्यान हवामान खात्याने आणखी एक इशारा दिला आहे. येत्या 4, 5 दिवस राज्यात मान्सून सर्वाधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर विदर्भ,मराठवाड्यातही काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही मुसळधार पावसासाठी लक्ष ठेवावे लागेल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीचं पाणी पात्राच्या बाहेर - राज्यात मुसळधार पावसाचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या महापुराचा सर्वाधिक फटका कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला बसतो. सोमवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे कोल्हापूर शहरातील रंकाळा तलाव, कळंबा तलाव, राजाराम तलाव आणि महत्त्वाचं म्हणजे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळीवर वाढली आहे. कोल्हापुरात काल संध्याकाळी एनडीआरएफची 2 पथकं दाखल झाली आहेत. यामध्ये 25 जवानांचा समावेश आहे. मागील 2 दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. 8 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे प्रशासनही अलर्ट मोडवर आलेले आहे. हेही वाचा - कोट्यवधीचं बजेट असलेल्या मुंबईची दरवर्षी तुंबई का होते? ही आहेत 5 कारणं, शेवटचं सर्वात महत्त्वाचं मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये - राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या  संपर्कात असून एनडीआरएफ जवानांना (NDRF) तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IMD FORECAST, Konkan, Rain

    पुढील बातम्या