मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुसळधार पावसामुळे राज्यात दाणादाण; शेताने घेतलं तळ्याचं रुप, धक्कादायक Video

मुसळधार पावसामुळे राज्यात दाणादाण; शेताने घेतलं तळ्याचं रुप, धक्कादायक Video

यवतमाळमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. (Yawatmal Rain Update) शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे.

यवतमाळमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. (Yawatmal Rain Update) शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे.

यवतमाळमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. (Yawatmal Rain Update) शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे.

    मुंबई, 9 जुलै : सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होत (Rain in Maharashtra) असल्यामुळे नद्या, नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. पावसामुळे निर्सगाचे सौंदर्य खुलले आहे. (Nature in Rain) यामुळे अनेक जण पर्यटनालाही प्राधान्य देत आहेत. तर काही ठिकाणी याच मुसळधार पावसामुळे राज्यात दाणादाण उडाली आहे. (Rain Situation in Maharashtra) शेतामध्ये तळ्याचं रुप झाले आहे. राज्यातील परिस्थिती नेमकी सध्याची परिस्थितीचा आढावा. यवतमाळात पावसामुळे शेकडो एकर जमीन पाण्याखाली - यवतमाळमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. (Yawatmal Rain Update) शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. तर शेतात 2 ते 3 फूट पाणी साचले आहे. यवतमाळमधील राळेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने वारा रोडवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. दुपारी दोन वाजेपासून साडेपाच वाजेपर्यंत मुसळधार पाऊस याठिकाणी झाला. या पावसाने राळेगाव, वारा, आष्टा, मेंगापूर कळमनेर, गुजरी यासह नाल्याच्या बाजूला असलेल्या शेतांना मोठा फटका बसला आहे. अंदाजे 300 ते 400 हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. आधी पाण्याअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. त्यात आता अति पाण्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. सोयाबीन, कापूस, तूर इतर पिकांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून तातडीने सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर वणी तालुक्यातील आणि झारी तालुक्यातील मुकुटबान जवळच्या पेटुर नदीला पूर आला आहे. नांदेड जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू - नांदेड जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. (Nanded Rain Update) त्यामुळे गोदावरी नदीत पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. विष्णुपुरी धरणाचे पाणलोट क्षेत्र आणि वरच्या भागातदेखील पाऊस झाला. त्यामुळे पाण्याचा ओघ वाढला आहे. आवक वाढल्याने विष्णूपुरी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. दोन दरवाजातून 812 क्युसेक इतक्या वेगाने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदी दूथडी भरुन वाहत आहे. नांदेड अतिवृष्टीची शक्यता असल्याने आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीत सार्वजनिक उदघोषणा प्रणाली कार्यान्वित - गेल्या वर्षीच्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात हाहाकार माजवला होता. (Ratnagiri Rain Update) अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूर आले होते. दरडी कोसळल्या होत्या. दरवर्षी बदलणारे हवामान व नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आता मात्र कंबर कसलेली पाहायला मिळते. नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील 400 ठिकाणी सार्वजनिक उदघोषणा प्रणाली बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आजपर्यंत 50 ठिकाणी ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. क्षणार्धात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा जिल्हाभरात संपर्क साधू शकते. ही टू वे कम्युनिकेशन अनाउन्समेंट सिस्टीम असून ही परिस्थिनुसार वेगवेगळ्या तीन अनाऊंस करते जेणेकरून तेथील नागरिकांना वेळीच सावध होता येते. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे जरी वीजपुरवठा खंडित झाला तरीदेखील ही यंत्रणा दोन, तीन दिवस चालू राहते. ही यंत्रणा gsm वर आधारित आहे. याचा संपूर्ण कंट्रोल जिल्हाधिकारी कार्यालयात आहे, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी दिली आहे. या यंत्रणेचा चांगला फायदा होत असल्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे. हेही वाचा - मावळ हळहळलं, मैत्रिणीसोबत फिरायला आली, नयनरम्य दृश्य पाहून भारावली, इंद्रायणी काठी पाय घसरला आणि... वर्ध्यात गेल्या तीन तासांपासून मुसळधार पाऊस - वर्ध्यात तीन तासाची उसंत घेतल्यानंतर पावसाने गेल्या तीन तासापासून वादळी पावसासह हजेरी लावली आहे. (Wardha Rain Update) मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील वाहनही दिसेनासी झाली होती. सखल भागात असणाऱ्या शाळेत पाणी शिरले होते. नदी, नाले, शहरातील नाल्या ओसंडून वाहत आहे. तर काही भागात नाल्या सफाई झाली नसल्याने बाजार परिसरात दुकानातही पाणी शिरल्याची माहिती आहे. साताऱ्यात संपर्क तुटला - साताऱ्यात मुसळधार पावसामुळे पाटण तालुक्यातील कसणी गावचा फुल पाण्याखाली गेला आहे. (Satara Rain Update) जोरदार झालेल्या पावसामुळे या पुलाच्या काही पाईपदेखील वाहून गेल्याचं येथील नागरिक सांगत आहेत. पुलावरून पाणी जात असल्यामुळे ढेबेवाडी विभागातील कसनी, घोटिळ, निगडे, मांगडेवाडी या गावांचा संपर्क तुटलेला आहे. पूलावरील पाणी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत या पुलावरून नागरिकांनी वाहतूक किंवा पूल ओलडण्याचा प्रयत्न करू नये, अशा सूचना स्थानिक प्रशासनाने दिला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IMD FORECAST, Maharashtra News, Rain

    पुढील बातम्या