LIVE NOW

सकाळच्या तुलनेत मुंबईत पावसाचा जोर ओसरला

मुंबईसह उपनगरात रात्रभरापासून पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय आहे. नवी मुंबई, अंधेरी, गोरेगाव, वसई, विरार भागातही जोरदार पाऊस सुरु आहे.

Lokmat.news18.com | June 25, 2018, 1:34 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated June 25, 2018
auto-refresh

Highlights

Load More
मुंबई, 25 जून : मुंबईसह उपनगरात रात्रभरापासून पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय आहे. नवी मुंबई, अंधेरी, गोरेगाव, वसई, विरार भागातही जोरदार पाऊस सुरु आहे. या दरम्यान पाणी भरल्यामुळे सकाळी ऑफिससाठी निघणाऱ्या मुंबईकरांची चांगलीच पंचाईत होतेय. सायन स्टेशनवर एक्सप्रेस, आणि लोकल ट्रेन ट्रॅकवर नाही तर पाण्यावर धावताना दिसतायत. रस्त्यावर पाणी असल्याने काही ठिकाणी गाड्याही बंद पडल्या आहेत. दरम्यान, पावसामुळे तिन्ही मार्गावरच्या रेल्वे धिम्या गतीने आहेत. 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे. येत्या 24 तासातही मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात येतोय. मुंबईतील वरळी, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, बोरिवली परिसरात पावसाच्या अधुनमधून मध्यम ते मुसळधार सरी कोसळत आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरातही पावसाचा जोर दिसून येतोय. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडा असं आव्हान मुंबईकारांना करण्यात आलं आहे. मुंबईत रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी तुंबलय. मुंबईच्या अंधेरी, बांद्रा, सायन, हिंदमाता, दादर भागात मुसळधार पाऊस पडल्याने हिंदमाता आणि सायन रेल्वे स्टेशनला नदीचं स्वरुप आलय. वसई : वसई तालुक्यात रात्री पासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरल्याने तुळींज रोड, सेंट्रल पार्क,गाला नगर ,परिसरात पाणी साचले असून वसई तालुक्यात 184 mm पावसाची नोंद झाली आहे. नवी मुंबईत सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस पडतोय. काल पासून सुरू झालेल्या पाऊसाने नवी मुंबईसह पनवेल मधील वातावरणात गारवा निर्माण झालाय. सतत पावसाच्या सरींमुळे शहरात एक आगीची घटना घडलीय तर दोन ठिकाणी झाडे पडली आहेत.
corona virus btn
corona virus btn
Loading