सावधान...मतमोजणीनंतर महाराष्ट्रात येणार चक्रीवादळ!

सावधान...मतमोजणीनंतर महाराष्ट्रात येणार चक्रीवादळ!

या चक्रीवादळामुळे मुंबई ठाणे आणि परिसरात मुसळधार पाऊस पडेल असा इशाराही देण्यात आलाय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पाऊस आणि चक्रीवादळाची शक्यता व्यक्त केली जातेय.

  • Share this:

मुंबई 23 ऑक्टोंबर : महाराष्ट्राला सध्या वेध लागलेत ते विधानसभा निवडणुकींच्या निकालांचे. उद्या म्हणजे 24 ऑक्टोबरला मतमोजणी असून महाराष्ट्रात कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे राज्यभर राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय वातावरण गरम असतानाच दुसरं एक वादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 25 आणि 26 ऑक्टोबरला महाराष्ट्रात चक्रीवादळाची शक्यता आहे असा इशारा हवामान विभागानं दिलाय. या चक्रीवादळामुळे मुंबई ठाणे आणि परिसरात मुसळधार पाऊस पडेल असा इशाराही देण्यात आलाय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पाऊस आणि चक्रीवादळाची शक्यता व्यक्त केली जातेय.

मी असेपर्यंत गायी खुशाल कापा.. रावसाहेब दानवेंकडून गोहत्या बंदी कायद्याची कत्तल

या काळात मच्छिमारांनी समुद्रात जावू नये असा सल्लाही हवामान विभागाने दिलाय. हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबई, ठाणे आणि परिसरात जोरदार पाऊस होऊ शकतो. मान्सून महाराष्ट्रातून परतल्यानंतरही पाऊस अजुनही राज्यात रेंगाळलेलाच आहे. पुणे आणि राज्यातल्या काही भागात पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

'मराठी चित्रपटाला प्राईम टाइम द्या, अन्यथा खळखट्याक'; मनसेचा इशारा

पुण्यासह राज्यात पुढील 48 तासांत मुसळधार पाऊसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. बुधवारी रात्रीही पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागातही जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो. राज्यात 27 ऑक्टोबरपर्यत पाऊस राहणार असून बंगाल आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस स्थिती निर्माण झाल्याचे पुणे वेधशाळेचे अधिकारी अनुपम कश्यप यांनी सांगितले आहे. तसेच मुंबई वेधशाळेने राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शनिवारपर्यंत राज्यभरात पावसाचं प्रमाण कमी-अधिक असेल. त्यामुळे गुलाबी थंडीत येणारी दिवाळी यावेळी ऐन पावसात साजरी करावी लागणार, अशी चिन्हे आहेत.

विधानसभेच्या निकालापूर्वीच काढली विजयी मिरवणूक, NCPच्या 'या' उमेदवारावर गुन्हा

पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत मंगळवार आणि बुधवार मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे सतर्क राहा, असा इशारा देण्यात आला आहे. काही भागात वादळी वाऱ्यांसह, ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारपर्यंत सतर्कतेचा इशारा म्हणजे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

पिकांचे मोठे नुकसान...

महाराष्ट्रातल्या कोकण, मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ आणि मराठवाड्यात लांबलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेला मका, बाजरी, ज्वारी, कपाशी पीक पूर्णपणे नष्ट झाले. या पावसाचा द्राक्ष बागांना देखील मोठा फटका बसलाला मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यात कापणी केलेले भातपीक पुरते वाया गेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2019 04:07 PM IST

ताज्या बातम्या