मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात

मुंबईत 48 तासात जोरदार पाऊस पडेल असं हवामान खात्याने शनिवारी सांगितलं होतं.आज सकाळी मुंबईत पावसाला सुरुवात झाली.

  • Share this:

11 जून : मुंबईत 48 तासात जोरदार पाऊस पडेल असं हवामान खात्याने शनिवारी सांगितलं होतं.आज सकाळी मुंबईत पावसाला सुरुवात झाली.पूर्व उपनगरात कुर्ला,चेंबूर घाटकोपर, असल्फा इथे जोरदार पाऊस पडत आहे.

रविवार असल्याने सकाळच्या वेळी रहदारी आणि वाहतूक कमी असते.अर्धा तास जोरदार पाऊस पडल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला असला तरी मधेच जोराचा पाऊस पडतो.

असाच जोराचा पाऊस पडला तर मुंबईतल्या सखल भागात पाणी भरण्याची शक्यता आहे.या पावसाने मुंबईकर सुखावला. यामुळे वातावरण पूर्णतः बदलले आणि हवेत आल्हाददायक गारवा निर्माण झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2017 12:40 PM IST

ताज्या बातम्या