मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Weather Forecast: उद्यापासून उन्हाची दाहकता आणखी वाढणार, 'या' जिल्ह्यांना हवामान खात्यानं केलं अलर्ट

Weather Forecast: उद्यापासून उन्हाची दाहकता आणखी वाढणार, 'या' जिल्ह्यांना हवामान खात्यानं केलं अलर्ट

Latest Weather Forecast: बंगलाच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाची तीव्रता कमी होताच, महाराष्ट्रासह वायव्य आणि मध्य भारतात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तर सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 28 मार्च: दिवसेंदिवस महाराष्ट्रासह आसपासच्या प्रदेशात किमान आणि कमाल तापमानाचा पारा (temperature in maharashtra) वाढतचं चालला आहे. गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात (Bay of bengal) निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबामुळे (Low pressure area) राज्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. पण बंगलाच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाची तीव्रता कमी होताच. महाराष्ट्रासह वायव्य आणि मध्य भारतात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तर सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्यात काल सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे. येथील तापमानाचा पारा 42.3 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला होता. त्यापाठोपाठ अमरावतीत 41.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. उर्वरित विदर्भातील जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 40 अंशाच्या आसपास नोंदलं गेलं आहे. आजही कमी अधिक प्रमाणात राज्यात हीच स्थिती कायम आहे. पण उद्यापासून विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाची दाहकता वाढणार आहे. हेही वाचा-शरीराला लोह कमी पडतं, तेव्हा अशी लक्षणं दिसतात; या गोष्टींनी भरून काढा कमतरता हवामान खात्याने उद्यापासून पुढील चार दिवस मराठवाड्यासह, उत्तर महाराष्ट्र आणि लगतच्या विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा (Heat wave alert) दिला आहे. हवामान विभागाने उद्या बुलडाणा, अकोला आणि अमरावती या तीन जिल्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. मागील काही दिवसांपासून या जिल्ह्यांत उष्णतेनं कहर केला असून नागरिकांना रात्री देखील उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महिन्याच्या शेवटी येथील तापमाना आणखी वाढण्याची शक्यता आहे. हेही वाचा-उन्हाळ्याच्या दिवसात कांदा खाण्याचे आहेत खास फायदे; उष्माघातही टाळता येतो येत्या काळात मराठवाड्यात तापमानाचा पारा 43 अंशावर जाण्याची शक्यता आहे. बुधवारी 30 मार्च रोजी हवामान खात्याने अहमदनगरसह औरंगाबाद, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलडाणा, अकोला अमरावती आणि यवतमाळ या अकरा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 31 मार्च रोजी देखील राज्यात हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. उर्वरती महाराष्ट्रात मात्र कोरडं हवामान राहणार असून उष्णतेचा पारा चढाच राहणार आहे. उर्वरित राज्यातील तापमान 33 ते 40 अंशादरम्यान राहण्याची शक्यता आहे.
First published:

Tags: Aurangabad, Weather forecast

पुढील बातम्या