Home /News /mumbai /

रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेची लाट, गेल्या 25 वर्षांत तिसऱ्यांदा सर्वाधिक तापमानाची नोंद

रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेची लाट, गेल्या 25 वर्षांत तिसऱ्यांदा सर्वाधिक तापमानाची नोंद

दोन दिवसांपूर्वीच अवकाळी पाऊस आणि वादळ झाल्यानंतर हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता

    रत्नागिरी, 27 मार्च : हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेची लाट आली असून खेडमध्ये आज कमाल तापमानाची 42 अंश सेल्सिअर इतकी नोंद झाली आहे. परिणामी दुपारी 12 वाजल्यानंतर नेहमी गजबजलेल्या मार्गावर देखील शुकशुकाट पाहायला मिळत होता. बाजार पेठेत देखील तुरळक गर्दी पाहायला मिळत होती. महामार्गावरून प्रवास करणारे लोक रसवंती गृह आणि कलिंगडाच्या ठेल्यावर थांबून उष्णतेपासून आपला बचाव करताना दिसत होते. (Heat wave in Ratnagiri district) दोन दिवसांपूर्वीच अवकाळी पाऊस आणि वादळ झाल्यानंतर हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आणि काल पासून रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. खेडमध्ये आज भयानक उष्णता नागरिकांना अनुभवायला मिळाली. तिसऱ्या दिवशीही कोकणात उष्णतेची लाट अनुभवायला मिळाली. हवामान विभागाने दिवसा तापमानाचा पारा 38 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार आज रत्नागिरीत तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअरपर्यंत पोहोचला. गेल्या 25 वर्षात तिसऱ्यांदा रत्नागिरीत सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. 16 मार्च 2011 मध्ये 40.6 आणि 8 मार्च 2004 मध्ये 40.2 अंश सेल्सिअर इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.(Heat wave in Ratnagiri district) हे ही वाचा-10 बळी घेणाऱ्या अग्नितांडवानंतरची भीषण दृश्य पाहून मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी गेल्या काही दिवसांतील रत्नागिरीचे तापमान 22 मार्च 2021 – 22.6 अंश से. (किमान) 33.4 अंश से. (कमाल) 23 मार्च 2021 – 24.0 अंश से. (किमान) 37.6 अंश से. (कमाल) 24 मार्च 2021 – 23.5 अंश से. (किमान) 39.0 अंश से. (कमाल) 25 मार्च 2021 – 24.5 अंश से. (किमान) 37.3 अंश से. (कमाल) 26 मार्च 2021 – 26.5 अंश से. (किमान) 40.0 अंश से. (कमाल)
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Ratnagiri

    पुढील बातम्या