'जास्त जवान शहीद झाले तरच राग येतो', शहीद कौस्तुभ राणेंच्या पत्नीने व्यक्त केली खंत

'जास्त जवान शहीद झाले तरच राग येतो', शहीद कौस्तुभ राणेंच्या पत्नीने व्यक्त केली खंत

पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये तब्बल 40 जवान शहीद झाले. म्हणून भारतीय लोकांना राग आला. पण जेव्हा एक जवान शहीद होतो त्यावेळी मात्र कोणाला राग येत नाही

  • Share this:

मुंबई, 06 मार्च : लालबागच्या राजा सार्वजनीक गणेशोत्सव मंडळातर्फे आज पुलवामा दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली. 7 ऑगस्ट 2018 रोजी काश्मीरमध्ये शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांची वीर पत्नी कनिका राणे यांनाही लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळा तर्फे 5 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

यावेळी मनोगत व्यक्तं करताना वीरपत्नी कनिका राणे यांनी भारतीय समाजाबद्दल खंत व्यक्त केली. 'जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये तब्बल 40 जवान शहीद झाले. म्हणून भारतीय लोकांना राग आला. पण जेव्हा एक जवान शहीद होतो त्यावेळी मात्र कोणाला राग येत नाही' असं खडे बोल या वीर पत्नी कनिका राणे यांनी बोलून दाखवले आहेत.

त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, 'जास्त लोक शहीद झाले तरच भारतीयांना राग येतो का...? मला तुम्हाला त्रास देण्याचा हेतू नाही. एक व्यक्ती शहीद झाला तर राग येत नाही का...? पुलवामात जास्त लोक शहीद झाले म्हणून तुम्हाला जास्त राग आला का...?' असे अनेक सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केले.

'मुंबईत मी एका अधिकाऱ्यांकडे गेले होते. त्यावेळी मी त्यांना मी माझी ओळख करून दिली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, वो मीरा रोड में हुवा था वो, सब बडे-बडे फूल लगे थे' हे असं ऐकल्यावर आम्हाला काय वाटत असेल याचा कोणी विचार केला का? आपल्याच शहरातील लोकांना त्यांच्याच शहरातील शहीदाची माहिती नाही. काय बोलावं यांना' असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठं तणावात वातावरण निर्माण झालं आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांकडून झालेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये भारतीय लष्कराने सीआरपीएफचे 40 जवान गमावले. या घटनेनंतर संपूर्ण देश रस्त्यावर उतरला होता. शहीद झालेल्या जवानांच्या जाण्याचा बदला घ्या असे नारे देत लाखोंनी लोक रस्त्यावर उतरली होती.

पण जर एकच जवान शहीद झाला असता तर त्याची झळ कोणालाच बसली नसती असं कनिका यांचं म्हणणं आहे.

SPECIAL REPORT : राफेलची कागदपत्रं कुणी 'उडवली'?

First published: March 6, 2019, 11:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading