महापालिकेच्या रुग्णालयात आता मिळणार 'हेल्थकार्ड'!

महापालिकेच्या रुग्णालयात आता मिळणार 'हेल्थकार्ड'!

रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांची नोंद राहावी आणि भविष्यातील औषधोपचारांच्या दृष्टीने वर्षानुवर्षे ही नोंद कायम राखावी यासाठी आता पालिका रुग्णालयांतर्फे रुग्णांना 'हेल्थकार्ड' देण्यात येणार आहे.

  • Share this:

23 मार्च : रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांची नोंद राहावी आणि भविष्यातील औषधोपचारांच्या दृष्टीने वर्षानुवर्षे ही नोंद कायम राखावी यासाठी आता पालिका रुग्णालयांतर्फे रुग्णांना 'हेल्थकार्ड' देण्यात येणार आहे. याकरिता मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये रुग्णालय व्यवस्थापन प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे.

रुग्णालयीन व्यवस्थापन प्रणालीचा प्रस्ताव नुकताच स्थायी समितीपुढे सादर करण्यात आला. या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यताही देण्यात आली आहे.

मात्र आता पालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून त्याचे परिपूर्ण सादरीकरण करण्यात येणार आहे. या माध्यमातून सध्या 5 रुग्णालयांत प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली कार्यरत होणार आहे.

 

First published: March 23, 2018, 9:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading