पावसानंतर रोगराईपासून वाचण्यासाठी बीएमसीचं आरोग्य शिबीर

पावसानंतर रोगराईपासून वाचण्यासाठी बीएमसीचं आरोग्य शिबीर

मुंबईत ज्यापरिसरात यापूर्वी लेप्टोचे जास्त रुग्ण आढळून आले आहेत, मंगळवारी त्याच भागात पाणी बराच काळ साचून राहिलं. अशा मुंबई आणि उपनगरांतील ९-१० वॉर्डात हे आरोग्य शिबीर भरवले जाणार आहे. त्यात अंधेरी, कांदीवली, विक्रोळी,अॅन्टॉप हिल, परळ, वरळी या भागांचा समावेश आहे.

  • Share this:

मुंबई,01सप्टेंबर: मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं होतं. त्यामुळे रोगरोई पसरण्याची भीती वाढली होती. त्यामुळे आता पाऊस थांबल्यानंतर बीएमसीनं आरोग्य शिबीरं भरवायला सुरुवात केली आहे.

मुंबईत ज्या परिसरात यापूर्वी लेप्टोचे जास्त रुग्ण आढळून आले आहेत,  मंगळवारी त्याच भागात पाणी बराच काळ साचून राहिलं. अशा मुंबई आणि उपनगरांतील ९-१० वॉर्डात हे आरोग्य शिबीर भरवले जाणार आहे. त्यात अंधेरी, कांदीवली, विक्रोळी,अॅन्टॉप हिल, परळ, वरळी या भागांचा समावेश आहे.

गुरूवारी लेलेवाडी अंधेरी इस्ट, आणि हनुमान नगर कांदिवली या परिसरात आरोग्य शिबीराचं आयोजन बीएमसीने केलं होतं. तर आज ओरडला भागात आरोग्य शिबीराचं आयोजन करण्यात येणार आहे. लेप्टोची तपासणी आणि उपचार या शिबीरांमध्ये केला जात आहे. लेलेवाडी परिसरातील शिबीरात २०० तर हनुमान नगर परिसरातील शिबीरात १२४ जणांनी उपचार घेतले आहेत.

साधारणतः लेप्टोची साथ ही पाणी साचलेल्या दिवसापासून २० दिवसांपर्यंत असते. त्यामुळे या काळात ही शिबीरं भरवली जाणार आहेत. थंडी वाजून ताप येणे, डोके दुखी, अंगदुखी ही लेप्टोची लक्षणं आहेत. त्यामुळे कुणालाही अशी लक्षणं दिसत असल्यास लगेच रक्त तपासणी करुन घेणं आवश्यक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2017 12:00 PM IST

ताज्या बातम्या