Home /News /mumbai /

'देशातील प्रभावी मुत्सद्द्यांपैकी ते एक'; राज ठाकरेंनीही जसवंत सिंहांची शेअर केली आठवण

'देशातील प्रभावी मुत्सद्द्यांपैकी ते एक'; राज ठाकरेंनीही जसवंत सिंहांची शेअर केली आठवण

पंतप्रधान मोदींसह राजनाथ सिंहांनीही जसवंत सिंहाना श्रद्धांजली अर्पण केली

    मुंबई, 27 सप्टेंबर : माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचं आज वयाच्या 82 व्या वर्षी निधन झालं. गेली सहा वर्षे ते कोमात होते. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलं. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही सोशल मीडियावर ट्विट करीत जसवंत सिंह यांना श्रद्धांजली अर्पण केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जसवंत सिंहाना श्रद्धांजली अर्पण करीत एक ट्विट केलं आहे. पोखरण 2 च्या अणुचाचण्यानंतर अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले, अशा वेळेस जसवंत सिंग ह्यांनी उत्तम मुत्सद्दीपणाचं कौशल्य दाखवत ते निर्बंध उठवायला लावले. आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीतील देशातील काही मोजक्या प्रभावी मुत्सद्द्यांपैकी ते एक. जसवंत सिंग ह्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन, असं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे. जसवंत सिंहाचा जन्म 3 जानेवारी 1938 मध्ये राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील जसोल गावात झाला. त्यांचा मोठा मुलगा मानवेंद्र सिंह बाडमेरमध्ये माजी खासदार राहिले आहेत. जसवंत सिंहाच्या राजकारणातील कामगिरीबद्दल सांगायचे झाल्यास 60 च्या दशकात ते राजकारणात आले. भाजपचे मोठे नेता आणि माजी उपराष्ट्रपती भैरव सिंह शेखावत यांना जसवंत सिंहाचा गुरु मानले जाते. ते 16 मे 1996 ते 1 जून 1996 पर्यंत देशाचे अर्थमंत्री राहिले. यावेळी अटल बिहारी वाजपेयी अवघ्या 13 दिवसांसाठी देशाचे पंतप्रधान झाले होते. दोन वर्षांनंतर जेव्हा वाजपेयी पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्यावर परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर 2002 मध्ये त्यांना अर्थमंत्रीपद देण्यात आले. जिन्नाचं कौतुक केलं म्हणून पार्टीबाहेर केलं आपलं पुस्तक 'जिन्नाह-इंडिया पार्टिशन इंडिपेन्डेन्समझ्' पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचं कौतुक केल्यामुळे भाजपने त्यांना 19 ऑगस्ट 2009 मध्ये पार्टीतून बेदखल केलं होतं. त्यानंतर जसवंत सिंह 2004 ते 2009 मध्ये संसदेत राज्यसभेत विपक्ष नेता म्हणून राहिले. त्यानंतर त्यांना पुन्हा पार्टीत घेण्यात आलं.  2012 मध्ये उपराष्ट्रपतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत जसवंत राजग उमेदवार होते. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि एआयएडीएमकेचे प्रमुख जयललिता यांनी जसवंत सिंह यांना समर्थनाची घोषणी केली होती.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Raj thacarey

    पुढील बातम्या