PPE कीटसाठीही मागितले पैसे, मयताच्या टाळू वरचे लोणी खाण्याचा प्रकार उघड

PPE कीटसाठीही मागितले पैसे, मयताच्या टाळू वरचे लोणी खाण्याचा प्रकार उघड

'वसई विरारमध्ये जर अंत्यसंस्कारासाठी घेतले जाणारे 4500 रुपये कोणाच्या खिशात जातात, त्याला कोणत्या अधिकाऱ्याचा आशीर्वाद आहे.'

  • Share this:

नालासोपारा, 20 एप्रिल : कोरोनाच्या (Corona) महामारीने जनता हैराण झाली असताना वसई विरार महानगरपालिकेच्या (vasai virar municipal corporation) स्मशानभूमीत मयताच्या टाळू वरचे लोणी खाण्याचा प्रकार समोर आला आहे. मृत्यू नंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पीपीई कीटसाठी मयतांच्या नातेवाईकांकडून 7 कीट साठी 4500 रुपये उकळले जात असल्याचा धक्कादायक माहिती मृताच्या नातेवाईकांनी दिली आहे.

वसई विरारमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 704 रुग्ण दिवसाला सापडत आहेत. त्याच प्रमाणात दिवसाला अधिकृतरित्या 8 रुग्णावर रुग्णांचे दिवसाला पालिकेतर्फे अंत्यसंस्कार केले जात असल्याचे सांगत असली तरी इतर ठिकाणी घरी झालेले मृत्यू कोरोना संशयित साधारण सर्व स्मशानभूमीत मिळून 30 च्या आसपास मृत्यू होत असतील, असे आमची वसईचे रुग्ण मित्र राजेंद्र ढगे यांनी शक्यता व्यक्त केली आहे.

...म्हणून remdesivir इंजेक्शनचे वाटप केले, रोहित पवारांचा भाजपवर पलटवार

कोरोनाबाधित आणि संशयित रुग्ण असल्यास मयतांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नाही. रुग्णालयातर्फे पूर्णतः गुंडाळून पालिकेच्या ताब्यात दिले जातात. यावेळी या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिकेतर्फे स्मशानभूमीत आणि रुग्णवाहिकेवर कर्मचारी नेमलेले आहेत. हे कर्मचारी PPE कीटची मागणी करून 7 पीपीई कीट मागत मयतांच्या नातेवाईकांकडून हजारो रुपये घेत आहेत.

मुळात पालिकेने हे कीट मोफत देत असल्याची माहिती पालिकेने दिली असतानाही रुग्णाच्या नातेवाईकांकडून पैसे उकळले जात आहेत. पश्चिम रेल्वेचे कर्मचारी अजय परब यांच्या वडिलांचा 16 एप्रिल रोजी कोरोनाने मृत्यू झाला. यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्याने पीपीई कीटसाठी ४५०० रुपये मागितले. विशेष बाब म्हणजे, याचे कोणतेही देयक त्यांनी मागूनही त्यांना देण्यात आले नाही.

गिरगांवची गल्ली ते युरोपची रंगभूमी; किशोर नांदलस्कर यांचा थक्क करणारा प्रवास

परब यांनी माहिती दिली की, त्यांना रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्याने हे पैसे पीपीई कीटसाठी मागितले. ते दुखात असल्याने त्यांनी कोणताही वाद न करता हे पैसे दिले. पण नंतर त्यांना माहिती मिळाली की पालिका पीपीई कीट मोफत देत आहेत.  दिवसाला 20 ते 30 मृत्यू होत आहेत. त्यात सर्व रुग्णाच्या नातेवाईकांना पीपीई कीटचे पैसे मागितले जात आहेत. यामुळे रुग्णालयांनी आणि रुग्णवाहिका चालकांनी नागरिकांची लूट चालविल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

वसई विरारमध्ये जर अंत्यसंस्कारासाठी घेतले जाणारे 4500 रुपये कोणाच्या खिशात जातात, त्याला कोणत्या अधिकाऱ्याचा आशीर्वाद आहे. याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी राजेंद्र ढगे यांनी केली आहे.

Published by: sachin Salve
First published: April 20, 2021, 7:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या