सी-लिंकवरून अज्ञात इसमाची आत्महत्या

सी-लिंकवरून अज्ञात इसमाची आत्महत्या

घटनेचा पोलीस अधिकारी तपास करत असून अजून तरी मयत व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

  • Share this:

मुंबई, 10 ऑक्टोबर : मुंबईत सी-लिंकवरून उडी मारून  एका अज्ञात इसमाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा पोलीस अधिकारी तपास करत असून अजून तरी मयत व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित इसम एका टॅक्सीत बसला.त्याने चालकास टॅक्सी लीलावती हॉस्पीटलमध्ये नेण्यास सांगितलं. लीलावती रूग्णालयात पोचल्यावर त्याला  वरळी सी -लिंकवर सोडण्याची विनंती केली. तिथे गेल्यावर जोराची लघवी लागल्याचे कारण सांगून तो उतरला. आणि सीलिंकवरून उडी मारून त्याने आत्महत्या केली आहे.

दरम्यान या अात्महत्येमागचे कारण कळलेले नाही. दगडावर आपटून संबंधित इसमाचा चेहराही खराब झाला आहे. या प्रकरणी आता पोलीस पुढील तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2017 05:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading