एचडीएफसी बँकचे अधिकारी सिद्धार्थ संघवी यांची हत्या केल्याची आरोपीची कबुली

मुंबईच्या मलबार हिलमध्ये राहणारे सिद्धार्थ संघवी यांची कार नवी मुंबईत आढळून आली होती

News18 Lokmat | Updated On: Sep 10, 2018 10:38 AM IST

एचडीएफसी बँकचे अधिकारी सिद्धार्थ संघवी यांची हत्या केल्याची आरोपीची कबुली

मुंबई, १० सप्टेंबर- एचडीएफसी बँकेचे अधिकारी सिद्धार्थ संघवी यांचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. मलंगगड रोडवरील काकड भागात त्यांच्या मृतदेह सापडला. काही दिवसांपूर्वी रक्ताने माखलेली त्यांची गाडी सापडली होती. त्यानंतर पोलिसांनी सिद्धार्थ यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतले असून त्याने खून केल्याची कबूली दिली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने याप्रकरणी सरफराज शेख या आरोपीला कोपरखैरणे येथील बोनकोडे भागातून अटक केली.

सिद्धार्थ यांचा मृतदेह काकड परिसरात टाकून दिल्याची कबूली सरफराज याने दिली. अजूनही मृतदेह सापडला नसून त्यांच्या मृतदेहाचा शोध पोलीस घेत आहेत. या हत्येत फक्त सरफराज सामील नसून अजून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. नेमकं कोणत्या कारणासाठी सिद्धार्थ यांची हत्या करण्यात आली याचाही पोलीस शोध घेत आहेत. लोअर परेल येथील कमला मिलमध्ये सिद्धार्थ कामाला होते. बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ते आपल्या कार्यालयातून बाहेर पडले. मात्र, ते घरी पोहोचलेच नाही. अखेर त्यांच्या कुटुंबियांनी एन.एम. जोशी मार्ग पोलीस स्थानकात हरवल्याची तक्रार दाखल केली.

तपासादरम्यान, सिद्धार्थ यांची गाडी कोपरखैरणे येथे सापडली. गाडीत चाकू आणि रक्ताचे डागदेखील सापडले. कारमधल्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते त्यांचेच आहेत, का , याची पडताळणी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यासाठी संघवी यांच्या आई-वडीलांचेही रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. मुंबईच्या मलबार हिलमध्ये राहणारे सिद्धार्थ संघवी यांची कार नवी मुंबईत आढळून आली होती. सरफराज शेख यांनी संघवी यांची गाडी कोपरखैरणेमध्ये आणल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले. तसेच संघवी यांच्या गाडीची चावी सरफराजच्या घरी आढळली. या माहितीच्या आधारावर नवी मुंबई पोलिसांनी सरफराजला रविवारी सकाळी ताब्यात घेतले. यानंतर सरफराजने सिद्धार्थ यांची हत्या केल्याची कबूली दिली.

न्यूयाॅर्क फॅशन शोमध्ये प्रियांका-निकच्या 'प्रेमलीला'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2018 10:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...