S M L

मुंबई विद्यापीठाची 6 सप्टेंबर ही निकालाची नवी डेडलाईन !

मुंबई विद्यापीठाने 6 सप्टेंबर ही निकालाची नवी डेडलाईन दिलीय. पावसामुळे निकाल लावण्यास विलंब होत असल्याचा अजब दावा विद्यापीठाने हायकोर्टात केलाय.

Chandrakant Funde | Updated On: Aug 31, 2017 02:58 PM IST

मुंबई विद्यापीठाची 6 सप्टेंबर ही निकालाची नवी डेडलाईन !

मुंबई, 31 ऑगस्ट : मुंबईत मंगळवारी पडलेला तुफान पाऊस आणि गणेशोत्सवामुळे आपण घेतलेल्या परीक्षांचे पूर्ण निकाल लावता आले नाहीत असा अजब दावा मुंबई विद्यापीठानं मुंबई हायकोर्टात केला आहे. आता विद्यापीठानं तब्बल सहाव्यांदा डेडलाईन बदलत आता ६ सप्टेंबर अशी नवी डेडलाईन ठेवली आहे. मंबई विद्यापीठाची निकालाची 31 ऑगस्ट ही डेडलाईन आज संपतेय. तरीही निकालाचा पत्ता नाहीये.

मंगळवारी मुंबई शहर आणि उपनगरात पडलेल्या पावसामुळे उपनगरात अनेक ठिकाणी वीज गेली होती आणि त्यामुळे पेपर तपासणीचं काम पूर्ण करता आलं नाही असा दावा विद्यापीठातर्फे करण्यात आला आहे. तसंच सध्या गणोशोत्सव सुरु असल्यामुळेदेखील पेपर तपासणीस विलंब झाला असल्याची माहिती विद्यापीठानं हायकोर्टानं दिली आहे.

मुसळधार पावसानं इंटरनेट सेवाही खंडित झाली होती त्यामुळे तपासणी पूर्ण झालेल्या पेपरचे गुण विद्यापीठाच्या वेबसाईटवर टाकता येत नसल्यानं महाविद्यालयांना निकालाचे गॅझेट पाठवून त्याद्वारे निकाल पोहोचले जातील असंही विद्यापीठानं कोर्टाला सांगितलं आहे. रखडलेल्या निकालामुळे लाॅ सीईटीचे आॅनलाईन फाॅर्म भरण्याची मुदत आता मुंबई हायकोर्टानं ६ सप्टेंबर केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 31, 2017 02:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close