S M L

फेरीवाल्यांचा विळखा सोडवण्यासाठी सचिनचा असाही 'तोडगा'

मुंबईतल्या पादचाऱ्यांनीदेखील फुटपाथ आणि स्कायवॉक्सचा वापर करावा अशी सुचना सचिन तेंडुलकरने केली आहे.

Sachin Salve | Updated On: Nov 1, 2017 09:13 PM IST

फेरीवाल्यांचा विळखा सोडवण्यासाठी सचिनचा असाही 'तोडगा'

01 नोव्हेंबर : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरातला फेरीवाल्यांचा विळखा सोडवायचा असेल तर शहरात फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन तयार करण्यात यावेत अशी मागणी राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर यांनी केली आहे. मुंबईतल्या पादचाऱ्यांनीदेखील फुटपाथ आणि स्कायवॉक्सचा वापर करावा अशी सुचना सचिन तेंडुलकरने केली आहे.

मुंबईत पादचाऱ्यांनी स्टेशन रोड परिसरातील ट्रॅफिकमधून चालण्यापेक्षा त्या परिसरातील फुटपाथ आणि स्कायवॉक्सचा वापर वाढवला तर या ठिकाणी फेरिवाले बसणार नाहीत असं सचिनचं म्हणणं आहे.

मुंबईतल्या मोकळ्या जागांवर योग्य नियोजन करून आठवडी बाजार भरवले पाहिजेत तसंच मुंबईत सगळीकडे तात्पुरते किंवा कायमस्वरूपी हॉकर्स झोन तयार केले पाहिजेत अशी सुचना सचिन तेंडुलकरने केली आहे.

मुंबई उपनगर डिपी 2025 तयार करत असताना मुंबईतल्या अनेक विषयांवर सचिन तेंडुलकरने आपल्या सुचना पत्राच्या माध्यमातून मुंबई उपनगर आयुक्तांना पाठवल्या आहेत. या पत्रात फेरिवाल्यांच्या विषयावर सचिन तेंडुलकरने आपलं मत व्यक्त केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 1, 2017 09:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close