निर्धारीत क्षेत्रातच फेरीवाल्यांना जागा, कोर्टाची निरुपमांना चपराक

निर्धारीत क्षेत्रातच फेरीवाल्यांना जागा, कोर्टाची निरुपमांना चपराक

परवानगी नसलेल्या क्षेत्रात फेरीवाल्यांनी व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली आहे. शाळा, धार्मिक स्थळं, रुग्णालयं यांच्या १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशन, मनपा मंडई १५० मीटर परिसरातही फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली आहे.

  • Share this:

 मुंबई,01 नोव्हेंबर:  फेरीवाल्यांना मुंबईत ठरवून दिलेल्या क्षेत्रातच आपला व्यवसाय करता येईल असे आदेश देऊन मुंबई हायकोर्टाने   मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांची याचिका फेटाळून लावली आहे. फेरीवाल्यांना मुंबईत व्यवसाय करता यावा अशी याचिका संजय निरूपम  यांनी हाय कोर्टात केली होती.

एल्फिन्स्टन ब्रिजच्या दुर्घटनेनंतर मुंबईत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलं आहे. एकीकडे मनसे फेरीवाले हटाव मोहीम चालवत असतानाच दुसरीकडे संजय निरूपम फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. फेरीवाल्यांना कुठेही व्यापार करता यावा यासाठी ही याचिका त्यांनी मुंबई हाय कोर्टात दाखल केली होती.

यावर कोर्टाने दिलेल्या  निर्णयानुसार परवानगी नसलेल्या क्षेत्रात फेरीवाल्यांनी व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली आहे.  शाळा, धार्मिक स्थळं, रुग्णालयं यांच्या १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली आहे.   रेल्वे स्टेशन, मनपा मंडई १५० मीटर परिसरातही फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मनसेची मुंबईत फेरीवाले हटाव मोहीम चालू आहे. एल्फिन्स्टनच्या दुर्घटनेनंतर दादर स्टेशन परिसरातून सगळे फेरीवाले हटवले गेले होते.  त्यानंतर मनसेने ठिकठिकाणी जाऊन फेरीवाल्यांना मनसैनिकांनी ही हटवले . याविरोधात  फेरीवाल्यांच्यासाठी आज निरूपम यांनी मुंबईत मोर्चाही काढला. याआधीही त्यांनी फेरीवाल्यांचा एक मोर्चा काढला होता.  त्याला मनसैनिकांनी तीव्र विरोध केला होता.

हायकोर्टाने दिलेल्या या निकालामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.

First published: November 1, 2017, 3:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading