Home /News /mumbai /

छगन भुजबळांचं आणि समर्थकांचं काय झालं होतं विसरलात का? शरद पवारांनी बंडखोर आमदारांना केलं अलर्ट

छगन भुजबळांचं आणि समर्थकांचं काय झालं होतं विसरलात का? शरद पवारांनी बंडखोर आमदारांना केलं अलर्ट

मतदारसंघात बंडखोरीचा आमदारांना मोठा धक्का बसू शकतो, असं म्हणत त्यांनी बंडखोरांना अलर्ट केलं.

    मुंबई, 23 जून : राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीनंतर शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली. बंडखोर आमदारांना त्यांनी उचलेलं हे पाऊल महागात पडणार असल्याच यापूर्वीही पवारांनी म्हटलं आहे. आजही त्यांनी आमदारांना अलर्ट करण्याचा प्रयत्न केला. अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील असंही सांगितलं. यावेळी पवारांनी छगन भुजबळांसोबत घडलेल्या त्या घटनेबाबतही सांगितलं. छगन भुजबळ जेव्हा शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले होते, तेव्हा त्यांच्यासोबत 13 ते 14 जणं होतं. काँग्रेसमध्ये आल्यानंतर एक प्रतिनिधी सोडता सर्वजणं निवडणुकीत अपयशी ठरले. मतदारसंघात  बंडखोरीचा आमदारांना मोठा धक्का बसू शकतो, असं म्हणत त्यांनी बंडखोरांना अलर्ट केलं. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे : -अडीच वर्षात मविआने मोठे निर्णय घेतले -मविआ सरकार बहुमत सिद्ध करेल -आमचं काम पाहता मविआ प्रयोग फसला असं म्हणणं राजकीय अज्ञान ठरेल -अडीच वर्षे हिंदूत्व आठवलं नाही, आताच का आठवलं. - शिंदे येथे आल्यानंतर सेनेत आहेत, असं स्पष्ट करतील याचा विश्वास आहे. -देशात 6 राष्ट्रीय पक्ष, त्यामुळे कोणता पक्ष त्यांच्यासोबत आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. -फक्त राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच निधी दिला हे असत्य आहे. -
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Eknath Shinde, NCP, Sharad Pawar (Politician), Shivsena

    पुढील बातम्या