Home /News /mumbai /

BREAKING : हसीना पारकरचा बॉडीगार्ड होता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, नवाब मलिक यांचा धक्कादायक जबाब

BREAKING : हसीना पारकरचा बॉडीगार्ड होता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, नवाब मलिक यांचा धक्कादायक जबाब

2002 सालापासून मी सलीम पटेलला ओळखत होतो तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता आणि आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष चंद्रकांत त्रिपाठी यांच्या नेतृत्वात तो काम करत होता,

मुंबई, 24 मे : गोवावाला कम्पाउंड मनी लाँड्र्रिंग प्रकरणाला (Money Laundering Case) धक्कादायक वळण मिळाले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची (underworld don dawood ibrahim)  बहिण हसीना पारकरचा (hasina parkar) बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर म्हणून काम पाहणारा सलीम पटेल (salim patel) हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता, असा धक्कादायक जबाब राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(nawab malik) यांनी ईडीला (ed) दिला आहे. नवाब मलिक सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. ईडीने नवाब मलिक यांचा जबाब नोंदवला आहे. जबाबात त्यांनी बहिण हसिना पारकरचा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर म्हणून काम पाहणारा सलीम पटेल हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता, असं कबूल केलं आहे. 2002 सालापासून मी सलीम पटेलला ओळखत होतो तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता आणि आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष चंद्रकांत त्रिपाठी यांच्या नेतृत्वात तो काम करत होता, असंही मलिक यांनी सांगितलं.  तसंच, नवाब मलिक यांनी जबाबात गोवावाला कंपाऊड संदर्भात झालेल्या व्यवहाराच्या बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या असंही म्हटलं आहे. (ऋषी कपूर यांच्या निधनानंतर अशी झाली होती नीतूंची अवस्था, आता केला खुलासा) गोवावाला कम्पाउंडच्या संबंधित व्यवहारात नवाब मलिक यांचे भाऊ अस्लम मलिक यांचाही महत्वाचा भाग आहे. 2005 साली मलिक यांनी सलीम पटेल विषयी लोकांना विचारलं त्यावेळी त्यांना त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं सांगण्यात आलं असंही मलिक यांनी म्हटलं आहे. (कुठे मीठ मागायचं नाही तर, कुठे किटली धूत नाहीत; जगात खाण्यासंबंधी आहेत अजब प्रथा) सलीम पटेल हा हसीना पारकरचा अत्यंत जवळचा निकटवर्तीय होता. हसीना पारकरने केलेल्या जवळपास सर्व व्यवहाराची त्याला कल्पना असायची. गोवावाला कम्पोउंड संदर्भात झालेल्या व्यवहारात सलीम पटेलला नवाब मलिक यांच्याकडून 15 लाख मिळले होते. यातील दुसरा आरोपी सरदार शाहवली खान याला 5 लाख, हसीना पारकरला रोख स्वरूपात 5 लाख आणि चेकमध्ये 5 लाख असे पैसे देण्यात आले होते. हे पैसे नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिक आणि भाऊ अस्लम मलिक यांच्यासमोर देण्यात आले होते, अशीही माहिती समोर आली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या