मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

भाजप नेते हर्षवर्धन पाटलांची लेक अंकिता होणार ठाकरे घराण्याची सून, राज ठाकरेंना आली लग्न पत्रिका

भाजप नेते हर्षवर्धन पाटलांची लेक अंकिता होणार ठाकरे घराण्याची सून, राज ठाकरेंना आली लग्न पत्रिका

Harshwardhan daughter ankita marriage in Thackeray family: भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता हिचा विवाह सोहळा ठाकरे घराण्यात होत आहे. येत्या 28 डिसेंबर रोजी हा विवाह सोहळा होणार आहे.

मुंबई, 8 डिसेंबर : महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या घरी सनई चौघड्यांचे सूर ऐकायला मिळत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांची मुलगी अंकिता पाटील (Ankita Patil) हिचा विवाह सोहळा होत आहे. अंकिता हर्षवर्धन पाटील आता ठाकरे घराण्याची सून होणार आहे. लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. (Harshwardhan Patil daughter Ankita marriage with Nihar Thackeray)

राज ठाकरेंना लग्न पत्रिका

प्रसारमाध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, अंकिता पाटीलचा विवाहसोहळा येत्या 28 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. मुंबईत हा विवाह सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी अंकिता आणि हर्षवर्धन पाटील हे लग्नाचं आमंत्रण देण्यात व्यस्त आहेत. मंगळवारी हर्षवर्धन पाटील हे आपली मुलगी अंकितासह राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लग्नाची पत्रिका देत लग्नसोहळ्याचं खास निमंत्रण  देण्यात आलं. स्वत: अंकिता यांनी राज ठाकरेंसोबत भेटीचा फोटोही शेअर केला आहे.

अंकिता होणार ठाकरे घराण्याची सून

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि बिंदुमाधव ठाकरे यांचा मुलगा निहार ठाकरे याच्यासोबत अंकिता पाटीलचा विवाहसोहळा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. अखेर या वृत्तावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. येत्या 28 डिसेंबर रोजी निहार आणि अंकिता विवाहबंधनात अडकणार आहेत.

अंकिता पाटीलचा अल्प परिचय

अंकिता पाटील या हर्षवर्धन पाटील यांची मुलगी आहे. त्यांनी परदेशात आपलं उच्चशिक्षण पूर्ण केलं आहे. अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. हार्वड विद्यापीठात अंकिता आणि निहार यांची ओळख झाली होती.

निहार ठाकरेंचा अल्प परिचय

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत निहार ठाकरे. निहार हे पेशाने वकील आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निहार यांचे काका आहेत.

जितेंद्र आव्हाडांनी घालून दिला आदर्श, मुलीचे केले रजिस्टर लग्न

बँडबाजा, वरात असा कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने पार पडलेल्या या लग्नाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (ncp minister jitendra awhad) यांच्या मुलीचा विवाहसोहळा (jitendra awhad daughter wedding) आज पार पडला आहे. एकीकडे अनेक नेते मोठ्या थाटामाटात आपल्या मुलांची लग्नं लावत असताना जितेंद्र आव्हाड यांनी मात्र अत्यंत साध्या पद्धतीने लग्न लावत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. रजिस्टर पद्धतीने करण्यात आलेल्या या लग्नात काही मोजकेच पाहुणे उपस्थित होते.

राजकीय नेत्यांच्या मुलांची लग्न म्हटलं की, महागड्या लग्न पत्रिका, फाईव्ह स्टार हॉटेल, मंत्र्यांपासून ते उद्योजकांची एकच लग्नाला गर्दी असते. पण जितेंद्र आव्हाड यांनी शाही लग्न पद्धतीला फाटा देऊन आपल्या मुलीचे अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलं आहे.

First published: