मुंबईतील हार्बर रेल्वे वाहतूक सुरळीत होण्याच्या मार्गावर

मुंबईतील हार्बर रेल्वे वाहतूक सुरळीत होण्याच्या मार्गावर

आज सकाळी सहा वाजल्यापासून या रूळ दुरुस्तीचं काम चालू होतं.त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. सीएसटी आणि ठाणे या दोन्ही दिशांना जाणाऱ्या लोकल खोळंबल्या होत्या.

  • Share this:

मुंबई,10 ऑक्टोबर: मुंबईला नवी मुंबईशी जोडणारी हार्बर रेल्वेची सेवा आज सकाळपासून विस्कळीत झाली होती. ती  हळूहळू पूर्वपदावर येते आहे.

आज सकाळपासून  चालू असलेलं  रूळ दुरूस्तीचं काम पूर्ण झालं असल्यामुळे ही रेल्वे  आता पूर्वपदावर येते आहे.पण अजूनही हार्बर लाईनवरील लोकल 10-15 मिनी उशीराने धावत आहेत.

हार्बर लाईनवर पनवेल जवळ रूळांना तडे गेले आहेत.आज सकाळी सहा वाजल्यापासून या रूळ दुरुस्तीचं काम चालू होतं. त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. सीएसटी आणि ठाणे या दोन्ही दिशांना जाणाऱ्या लोकल खोळंबल्या होत्या. आज सकाळपासून अनेक गाड्या रेल्वे रुळांवरच उभ्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची खूप गैरसोय झाली होती.

हार्बर रेल्वे विस्कळीत होण्याची ही काही पहिली वेळ नाही.या आधी अनेकदा अशा समस्यांमुळे हार्बर रेल्वे बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे रेल्वे प्रशासन आतातरी या प्रश्नांकडे लक्ष देतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2017 08:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading