हार्बर रेल्वे मार्ग ठप्प, प्रवाशांचे प्रचंड हाल

हार्बर रेल्वे मार्ग ठप्प, प्रवाशांचे प्रचंड हाल

वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचं पाहायला मिळालं.

  • Share this:

नवी मुंबई, 1 एप्रिल : हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुमारे अर्ध्या तासापासून रेल्वे गाड्या जागेवरच उभ्या असल्याची माहिती आहे. खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे या मार्गावर एकही लोकल धावू शकलेली नाही. लोकल वाहतूक सुरळीत व्हायला आणखी अर्ध्या तास लागू शकतो, अशी माहिती आहे.

वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचं पाहायला मिळतं आहे. कामावरून घरी जाण्याच्या वेळेतच रेल्वे वाहतुकीला विलंब होत असल्याने अनेक प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान,  वाहतूक लगेच सुरळीत करणं शक्य नसल्याने रेल्वेकडून प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

VIDEO: आपल्या वाढदिवसानिमित्त आठवेलेंनी मोदींवर केली 'ही' कविता

First published: April 1, 2019, 5:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading