पहिल्या पावसातच रेल्वेचं कंबरडं मोडलं, 40 मिनिटांपासून हार्बर रेल्वे विस्कळित

पहिल्या पावसातच रेल्वेचं कंबरडं मोडलं, 40 मिनिटांपासून हार्बर रेल्वे विस्कळित

रेल्वे सेवा विस्कळित झाल्याने रेल्वेतले पंखे आणि लाईटही बंद आहेत.

  • Share this:

नवी मुंबई, ता. 04 जून : राज्यासह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. नवी मुंबईतही काल आणि आज जोरजार पावसाच्या सरी बरसल्या. दरम्यान या पहिल्याच पावसात रेल्वेचं कंबरड मोडलं आहे. कारण गेल्या 40 मिनिटांपासून हार्बर रेल्वे ठप्प झाली आहे. नेरुळ ते बेलापूर दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बरची रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

पहिल्या पावसात मुंबईची रेल्वे ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. एनवेळी पाऊस आल्याने कोणाकडेच छत्र्या किंवा रेनकोट नाही, त्यात रेल्वेचा असा सावळा गोंधळ. या सगळ्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले असं म्हणायला हरकत नाही.

दरम्यान, रेल्वे सेवा विस्कळित झाल्याने रेल्वेतले पंखे आणि लाईटही बंद आहेत. एकंदरीत रेल्वेच्या या सगळ्या कारभारामुळे रेल्वेनं मान्सूनपूर्व तयारी केली होती का ? असा सवालही उपस्थित होतो.

First published: June 4, 2018, 9:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading