Home /News /mumbai /

त्याच्यावर कोरोनाचा उपचार करू नका, वाचला तर भरचौकात फासावर लटकवा, मनसे नेत्याच्या मागणी

त्याच्यावर कोरोनाचा उपचार करू नका, वाचला तर भरचौकात फासावर लटकवा, मनसे नेत्याच्या मागणी

क्वारंटाइन सेंटरमध्ये अशी घटना उघडकीस येत आल्यामुळे महिला कुठेही सुरक्षित नाहीत, हे पुन्हा सिद्ध झाले आहे

    मुंबई, 18 जुलै : पनवेलमधील क्वारंटाइन सेंटरमध्ये एका महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घडना घडली होती. या प्रकरणातील आरोपीला कोणताही उपचार मिळू नये आणि वाचला तर त्याला चौकात फाशी द्या, अशी मागणी मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. शालिनी ठाकरे यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून राज्य सरकारकडे या प्रकरणावर कारवाई करण्याची मागणी केली. 'पनवेलमध्ये क्वारंटाइन सेंटरमधील महिला रुग्णावर एका पुरुष रुग्णाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. या बलात्काऱ्याला कोणतेही वैद्यकीय उपचार मिळू नये आणि जर कोरोनातून हा वाचला तर त्याला चौकात फाशी ही अंतिम शिक्षा द्यावी' अशी मागणी शालिनी ठाकरे यांनी केली. तसंच, ' क्वारंटाइन सेंटरमध्ये अशी घटना उघडकीस येत आल्यामुळे महिला कुठेही सुरक्षित नाहीत, हे पुन्हा सिद्ध झाले आहे' अशी टीकाही ठाकरे यांनी केली. काय आहे प्रकरण? पनवेलमधील कोन गावात इंडिया बुल्स इथं डॉक्टर असल्याचं सांगून  क्वारंटाइन सेंटरमध्ये एका 40 वर्षीय महिलेवर अत्याचार केले होते. आरोपी देखील संशयित कोरोना रुग्ण आहे. दोघे ही नवी मुंबईतील राहणारे आहेत. पनवेल तालुका पोलिसांनी याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे.  मात्र, ज्या ठिकाणी एखादी महिला कोरोनाशी लढत असेल अश्या वेळी तिचा विनयभंग होणं म्हणजेच तिथे प्रशासनाची हलगर्जीपणा किती आहे हे लक्षात येते. नवी मुंबई महापालिकेचे कोरोना रुग्णांना तिथे क्वारंटाइन करण्यात आले आहे. आरोपीचा क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर पनवेल तालुका पोलीस पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: MNS, Panvel

    पुढील बातम्या