• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Dombivli Gang Rape : '33 राक्षसांना फाशी द्या, नाहीतर गुप्तांग कापा', बॅनर लावून MNSचा आक्रमक पवित्रा

Dombivli Gang Rape : '33 राक्षसांना फाशी द्या, नाहीतर गुप्तांग कापा', बॅनर लावून MNSचा आक्रमक पवित्रा

मनसेचे पदाधिकारी महेश कदम यांनी चंदनवाडी याठिकाणी बॅनर लावून 33 राक्षसांना फाशी देण्याची मागणी केली आहे.

मनसेचे पदाधिकारी महेश कदम यांनी चंदनवाडी याठिकाणी बॅनर लावून 33 राक्षसांना फाशी देण्याची मागणी केली आहे.

डोंबिवलीत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी सामूहिक बलात्कार (Dombivli Gang Rape Case) केल्याची घटना अलीकडेच उघडकीस आली आहे. याप्रकरणी मनसे आक्रमक झाली आहे.

  • Share this:
    डोंबिवली, 25 सप्टेंबर: डोंबिवलीत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी सामूहिक बलात्कार (Dombivli Gang Rape Case) केल्याची घटना अलीकडेच उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 23 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. सोशल मीडियावर देखील अनेकांनी तीव्र निषेध व्यक्त करत, नरधमांना फाशी देण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी आता मनसेनं देखील आक्रमक भूमिका घेतील असून नरधामांना फाशीची शिक्षा द्या अथवा त्याचं गुप्तांग कापा अशी मागणी केली आहे. तसेच मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून अशी मागणी करणारा बॅनर देखील लावण्यात आला आहे. मनसेचे कोपारी पाचपाखाडी विभागाचे अध्यक्ष महेश कदम यांनी चंदनवाडी याठिकाणी बॅनर लावून 33 राक्षसांना फाशी देण्याची मागणी केली आहे. संबंधित बॅनरमध्ये 33 नराधमाचा प्रतिकात्मक फोटो म्हणून 33 तोंडी राक्षसाचा फोटो लावण्यात आला आहे. तसेच 'डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या 33 राक्षसांना फाशी द्या, नाहीतर त्याचं गुप्तांग कापा' अशी मागणी संबंधित बॅनरमधून करण्यात आली आहे. याप्रकरणी मनसे आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नेमकी घटना काय आहे? डोंबिवली येथील रहिवासी असणाऱ्या 15 वर्षीय पीडित मुलीवर गेल्या 9 महिन्यांपासून सामूहिक बलात्कार केला जात होता. आतापर्यंत तब्बल 33 जणांनी तिच्यावर वेळोवेळी तिला ब्लॅकमेल करत क्रूरतेचा कळस गाठला आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या मानलेल्या भावाने तिची ओळख आरोपीच्या मित्राशी करून दिली होती. संबंधित मित्राने तिची ओळख मुख्य आरोपीशी करून दिली होती. त्यानंतर मुलीसोबत हे अत्याचाराचं सत्र सुरू झालं होतं. आरोपींनी कधी गुंगीचं औषध तर कधी दारू पाजून पीडितेला नरक यातना दिल्या आहेत. हेही वाचा-डॉक्टर तरुणीवर बलात्कार; अश्लील VIDEO शूट करत पीडितेच्या आई-वडिलांना पाठवले अन्. नराधम आरोपीने सर्वप्रथम 29 जानेवारी 2021 रोजी पीडितेला आपलं घर दाखवतो, असं सांगून पीडितेला मित्राच्या घरी घेऊन गेला होता. याठिकाणी आरोपीनं पीडितेला अश्लील व्हिडीओ (Shoot obscene videos) दाखवून जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर घरातील अन्य आरोपींनी देखील पीडितेवर आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेन सर्व आरोपींशी सर्व संपर्क तोडला आणि त्यांचे मोबाइल नंबर डिलीट केले. पण आरोपीनं पुन्हा फेब्रुवारीमध्ये पीडितेला फोन करून भेटायला बोलवू लागला. तसेच भेटायला आली नाही. तर तुझे नग्न व्हिडीओ तुझ्या आई वडिलांना दाखवेन अशी धमकीही आरोपीने दिली. हेही वाचा-कंडोमऐवजी करायचे प्लॅस्टिक पिशवीचा वापर; डोंबिवली गँगरेप प्रकरणात नवीन खुलासा आरोपीच्या धमकीला घाबरून पीडित मुलगी पुन्हा एकदा आरोपीला भेटायला गेली. आरोपीने पीडितेला आणखी एका मित्राच्या घरी नेऊन तिला शीतपेयातून गुंगीचं औषध दिलं. पण पीडितेनं संबंधित शीतपेय पिण्यास नकार दिल्याने त्याने 'तुला विना कपड्याची घरी पाठवेन' अशी धमकी दिली. यानंतर याठिकाणी देखील तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.  मुख्य आरोपीने स्वत: पीडितेचे लचके तोडलेच पण तिच्यावर केलेल्या बलात्काराचा व्हिडीओ काढून तिला अनेकदा ब्लॅकमेलही केलं आहे. अशाचप्रकारे आरोपींनी व्हिडीओच्या आधारे तिच्यावर तब्बल आठवेळा सामूहिक बलात्कार केला आहे.
    Published by:News18 Desk
    First published: