नवी मुंबईकरांच्या जीवाला धोका, डॉक्टरांनी वापरलेले हातमोजे धुवून पुन्हा वापरात

नवी मुंबईकरांच्या जीवाला धोका, डॉक्टरांनी वापरलेले हातमोजे धुवून पुन्हा वापरात

क्राईम ब्रांच पोलिसांतर्फे हा धक्कादायक प्रकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 19 ऑगस्ट : कोरोनाच्या महामारीमुळे आरोग्य हा सध्या महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. आरोग्यदायी जीवन हीच सध्या काळाची गरज आहे. पण अशात नवी मुंबई ही सगळ्यात स्वच्छ शहरांमध्ये मोजली जाते. पण तिथेच स्वच्छतेचे बारा वाजल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. नवी मुंबईत जीवाशी खेळ होईल असा भयंकर प्रकार समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी वापरलेले हातमोजे धुवून पुनः वापरात आणण्यात येत होते. क्राईम ब्रांच पोलिसांतर्फे हा धक्कादायक प्रकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

पावणे एमआयडीसी इथे छापा टाकून पोलिसांनी तब्बल 263 गोणी वापरलेले हातमोजे जप्त केले आहेत. अंदाजे 4 लाख रबरी हातमोज्यासह ते धुण्यासाठी वापरण्यात आलेल्या 2 वॉशिंग मशीन, हातमोजे सुकवण्यासाठी वापरण्यात आलेले 3 ब्लोअर मशीन असं एकूण 6 लाख 10 हजार 720 रुपयांचा माल जप्त केला आहे.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गेल्या 10 दिवसांत असा घटला कोरोनाचा आलेख

हे वैद्यकिय हातमोजे विकणाऱ्या प्रशांत सुर्वेला पोलिसांनी अटक करत गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबई पोलीस वापरलेले वैद्यकीय हातमोजे कोठून आणले व कोठे विकणार होते याची चौकशी करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. खरंतर, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अशा प्रकारे थेट जीवाशी खेळ होऊ शकतो यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

पुणे पालिकेने घातला मोठा गोंधळ, कोरोनाच्या संकटात भोंगळा कारभार चव्हाट्यावर

खरंतर कोरोना ही आपल्या आरोग्याची एक परीक्षा आहे. अशात राज्यात कोरोनाचा कहरही वाढत आहे. गेल्या 24 तासांत 13,165 नवे कोरोनारुग्ण राज्यात सापडले आहेत. सध्या सर्वाधिक अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) वाढत असलं, तरी रुग्णवाढीचा दर आणि हा विषाणू गावागावात पसरण्याचा आवाका वाढला आहे.

गेल्या 24 तासांत 9011 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत 4,46881 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आज 346 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर 3.35 टक्के एवढा आहे. राज्यात 11,62450 रुग्ण विलगीकरण मध्ये आहेत. 37094 संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 19, 2020, 9:46 PM IST

ताज्या बातम्या