'पाकिस्तानात मला खूप टॉर्चर केलं', 6 वर्षानंतर मुंबईत परतलेल्या हमीदची वेदनादायी कहाणी

'पाकिस्तानात मला खूप टॉर्चर केलं', 6 वर्षानंतर मुंबईत परतलेल्या हमीदची वेदनादायी कहाणी

हमीद अन्सारी हा मुंबईतला तरूण 2012 साली फेसबुकवरून पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडला आणि तिला भेटण्यासाठी त्यानं थेट पाकिस्तान गाठलं होतं.

  • Share this:

दिवाकर सिंग, मुंबई, 20 डिसेंबर : फेसबुकवर झालेल्या प्रेमासाठी पाकिस्तानला गेलेला हमीद अन्सारी तब्बल 6 वर्षांनंतर मुंबईत परतला आहे. 'पाकिस्तानात मला खूप टॉर्चर करण्यात आलं. माझ्या डोळ्यालाही मोठी जखम झाली होती. पण आईच्या प्रार्थनेमुळे माझी सुटका झाली आहे. आता मला त्या वेदना पुन्हा आठवायच्या नाहीत,' असं म्हणत हमीदने त्याच्यावर झालेल्या अत्याचाराबाबतची माहिती दिली आहे.

हमीद अन्सारी हा मुंबईतला तरूण 2012साली फेसबुकवरून पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडला आणि तिला भेटण्यासाठी त्यानं थेट पाकिस्तान गाठलं. हमीदची त्या मुलीसोबत भेट तर झालीच नाही, मात्र त्याला पाकिस्तानच्या तुरुंगात 6 वर्ष खितपत काढावी लागली. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही हमीद निहाल अन्सारीची कहाणी आहे. हमीदची मंगळवारी पेशावरच्या तुरुंगातून सुटका झाली आणि तो भारतात परत आला.

हमीद या मुंबईत वर्सोव्यात राहणाऱ्या तरुणाची फेसबुकवर एका पाकिस्तानी तरुणीशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. त्या तरुणीच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या हमीदने तिला भेटण्यासाठी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला.

पाकिस्तानात थेट जाणं शक्य नसल्यानं तो 2012मध्ये अफगाणिस्तानमार्गे पकिस्तानात पोहोचला. मात्र त्याला आपल्या प्रेयसीला भेटता आलं नाही. त्या आधीच पाकिस्तानी पोलीस आणि गुप्तचर संस्थांनी त्याला बेकायदा प्रवेश केल्याच्या आरोपावरून अटक केली. हमीद गुप्तहेर असल्याचा ठपका ठेवण्यात आला आणि त्याची रवानगी पेशावरच्या तुरुंगात झाली होती.


शिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकाचं काम सुरू, पाहा VIDEOबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2018 10:52 AM IST

ताज्या बातम्या