Home /News /mumbai /

महाराष्ट्रात गारपिटीचं संकट; पुढील 3 दिवस राज्यभर विजांचा गडगडाट, हवामान खात्याचा हाय Alert

महाराष्ट्रात गारपिटीचं संकट; पुढील 3 दिवस राज्यभर विजांचा गडगडाट, हवामान खात्याचा हाय Alert

Latest Weather Forecast: आजपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता (rainfall) आहे.

    मुंबई, 07 मार्च: पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे सध्या अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान (Rainy Weather) निर्माण झालं आहे. आजपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता (rainfall) आहे. पुढील तीन दिवस भारतीय हवामान खात्याने (IMD) उत्तर महाराष्ट्रासह, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. याशिवाय महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर (Cyclone Alert in Mumbai) चक्रीवादळाचं संकट घोंघावू लागलं आहे. मुंबईत कमाल तापमानात वाढ होत असल्यानं मुंबईकर हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस मुंबईच्या तापमानात वाढ होत असून, वाढते तापमान धोकादायक पातळीकडे वाटचाल करत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. तसेच, समुद्राचे तापमान वाढल्यास मुंबईवर चक्रीवादळाचं संकट निर्माण होण्याची शक्यता धक्कादायक माहिती इंटरगर्व्हन्मेटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या सहाव्या मूल्यांकन अहवालातून समोर आली आहे. हेही वाचा-सावध रहा...Corona संपलेला नाही, लवकरच येऊ शकतो नवा व्हेरिएंट हवामान खात्याने आज नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, बीड आणि जालना या सात जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. येत्या काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान आकाशात विजा चमकण्याचं प्रमाण अधिक राहणार आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यांत राहणाऱ्या नागरिकांनी लांबचा प्रवास टाळावा तसेच आकाशात विजा चमकत असताना मोठ्या झाडाच्या आडोशाला उभं राहू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. त्याचबरोबर आज पुण्यासह, अहमदनगर, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांत देखील ढगाळ हवामान राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. हेही वाचा-कडुनिंब ठरेल कोरोनावर उपाय! फुफ्फुसांमधील संसर्ग रोखण्यास होईल मदत 8 आणि 9 मार्च रोजी राज्यात पावसाची व्याप्ती आणखी वाढणार असून राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मंगळवारी दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, सिंधुदुर्ग, नांदेड आणि मुंबई ही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. बुधवारी देखील कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. त्यानंतर गुरुवारपासून मात्र पावसाचा जोर हळुहळू कमी होण्याची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cyclone, Maharashtra, Rainfall, Todays weather, Weather forecast

    पुढील बातम्या