मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Weather Update: अरबी समुद्रात वादळी वारे, मच्छिमारांना इशारा, मुंबईसह 13 जिल्ह्यात हाय अलर्ट

Weather Update: अरबी समुद्रात वादळी वारे, मच्छिमारांना इशारा, मुंबईसह 13 जिल्ह्यात हाय अलर्ट

दक्षिण अंदमान समुद्राच्या क्षेत्रात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानंतर, आता पुन्हा एकदा अरबी समुद्रात (Arabian Sea) हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र (Low Pressure Area) निर्माण झालं आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 17 नोव्हेंबर: दक्षिण अंदमान समुद्राच्या क्षेत्रात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानंतर, आता पुन्हा एकदा अरबी समुद्रात (Arabian Sea) हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र (Low Pressure Area) निर्माण झालं आहे. पुढील एक-दोन दिवसांत याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. परिणामी पुढील पाच दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागण्याची (Rain in maharashtra) शक्यता आहे. त्यामुळे पुढील पाचही दिवस हवामान खात्याने विविध जिल्ह्यांना तीव्र पावसाचा इशारा दिला आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असून अरबी आज आणि उद्या मध्य-पूर्व अरबी समुद्रात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 19 नोव्हेंबरनंतर याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळपासूनच अरबी समुद्रात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात 40 ते 50 किमी प्रतितास वेगानं वारे वाहत आहे.

पुढील काही तासांत वाऱ्याची गती आणखी वाढण्याची शक्यता असून वाऱ्यांचा वेग 60 किमी प्रतितास इतका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे  मच्छिमारांनी मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तसेच खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना तातडीनं समुद्रकिनारी येण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हेही वाचा-रब्बी पिकांना अवकाळी पावसाचा धोका; पुढील 4 दिवस महत्त्वाचे, पुण्यालाही इशारा

हवामान खात्याने आज मुंबईसह, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तेरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन ते चार तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील पाचही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, घाट परिसर आदी ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

First published:

Tags: Weather forecast, महाराष्ट्र