मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Guru Purnima 2021 Messages in Marathi: गुरुपौर्णिमा निमित्त शुभेच्छा मेसेज; Facebook, WhatsApp स्टेटस

Guru Purnima 2021 Messages in Marathi: गुरुपौर्णिमा निमित्त शुभेच्छा मेसेज; Facebook, WhatsApp स्टेटस

Guru Purnima 2021 Messages: गुरुपौर्णिमा निमित्त शुभेच्छा देणारे खास मराठमोळे मेसेजेस आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Guru Purnima 2021 Messages: गुरुपौर्णिमा निमित्त शुभेच्छा देणारे खास मराठमोळे मेसेजेस आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Guru Purnima 2021 Messages: गुरुपौर्णिमा निमित्त शुभेच्छा देणारे खास मराठमोळे मेसेजेस आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 22 जुलै: Guru Purnima 2021 Facebook WhatsApp Marathi Messages: भारतात गुरुपौर्णिमाला (Guru Purnima) एक वेगळे आणि खूपच खास महत्त्व आहे. आषाढ पौर्णिमेला (Ashadh Purnima) दरवर्षी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. यंदा 23 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा (Vyas Purnmia) असंही म्हटलं जातं. व्यास ऋषींचे स्मरण करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. या दिवशी आपल्या गुरुंचा आदर आणि त्यांच्याप्रती असलेले प्रेम व्यक्त करण्यात येते.

धर्मग्रंशातही गुरुचे स्थान हे भगवंतांच्या बरोबरीचे असल्याचे म्हटले जाते. आपले गुरुच आपल्या ज्ञानात भर घालतात आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच आपण पुढे वाटचाल करत असतो. दरवर्षी मंदिरात, शाळा-महाविद्यालयांत आणि इतरही ठिकाणी मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. मात्र, यंदा असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वांना नियमांचे पालन करुनच सण-उत्सव साजरे करण्यात येत आहेत. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गुरुवर्यांना शुभेच्छा देऊ शकतात. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे काही मेसेजेस सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. सोशल मीडियात व्हायरल होणारे हेच मेसेजेस (Guru Purnima messages in Marathi) आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पाहूयात गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा (Happy Guru Purnima messages) देणारे काही खास मराठी मेसेजेस.

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस (Guru Purnima 2021 Messages)

|| गुरु: ब्रह्मा गुरु: विष्णू गुरु: देवो महेश्वर: ||

|| गुरु: साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम: ||

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

ज्यांनी मला घडवलं,

या जीवनात मला जगायला शिकवलं,

लढायला शिकवलं,

अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे...

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

आदी गुरुसी वंदावे

मग साधनं साधावे

गुरु म्हणजे माय बापं

नाम घेता हरतील पाप

गुरु म्हणजे आहे काशी

साती तिर्थ तया पाशी

तुका म्हणे ऐसे गुरु

चरणं त्याचे ह्रदयीं धरू

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

आई माझी गुरू,

आई माझी कल्पतरु

माझ्या प्रिय आईला

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

गुरु जगाची माऊली

सुखाची सावली

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

गुरु आहेत सगळ्यात महान,

जे देतात सगळ्यांना ज्ञान

गुरुपौर्णिमेला करुया त्यांना प्रणाम

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

आई-वडील प्रथम गुरु

त्यांच्यापासून सगळ्यांचे अस्तित्व सुरू

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

गुरुने दिला ज्ञानरुपी वसा

आम्ही चालवू हा पुढे वारसा

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

First published: