Home /News /mumbai /

Gunratna Sadavarte: "होय... मी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले पण...." गुणरत्न सदावर्ते यांची कोर्टात कबुली

Gunratna Sadavarte: "होय... मी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले पण...." गुणरत्न सदावर्ते यांची कोर्टात कबुली

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते यांना आज गिरगाव कोर्टात हजर केले. यावेळी झालेल्या युक्तीवादानंतर सदावर्ते याना न्यायालयीन कोटडी सुनावली आहे.

मुंबई, 20 एप्रिल : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना आज गिरगाव कोर्टात (Girgaon Court) हजर केले आहे. यावेळी झालेल्या युक्तीवादानंतर गिरगाव कोर्टाने (Girgaon Court) गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे गुणरत्न सतावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. (Gunratna Sadavarte sent to judicial custody) आज काय घडलं कोर्टात? एसटी कर्मचाऱ्यांकडून गुणरत्न सदावर्ते यांनी पैसे घेतले होते आणि त्या पैशातून मालमत्ता, गाडी खरेदी केली. याप्रकरणाच्या तपासाकरता पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली. कोर्टात युक्तीवाद करताना विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी म्हटलं, सदावर्ते यांच्या घराच्या झडतीत महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या आहेत. कागदपत्रे, रजिस्टर आणि नोटा मोजण्याची मशीन सापडली आहे. यावेळी विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी हर्षद मेहता प्रकरणाचा निकाल सदावर्ते प्रकरणात रिफरन्स म्हणुन वाचून दाखवला. वाचा : घरामध्ये पैसे मोजण्याचं मशीन, परळमध्ये जागा, नवी गाडी, सदावर्तेंची एसटी कर्मचाऱ्यांच्या पैशांमधून मालमत्ता खरेदी? त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी स्वत: युक्तीवाद करत आपली बाजू मांडली. सदावर्ते यांच्या बाजूने आज कोर्टात कुणीच वकील आलं नसल्याने त्यांनीच आपली बाजू मांडली. गुणरत्न सतावर्ते म्हणाले, पोलीस हे दाखवण्याचा प्रयत्न करतायेत की हा एक मोठा स्कॅम आहे. मी 300 ते 500 रुपये घेतले पण ते फक्त कोर्ट कामकाजाकरता घेतले. एवढे कमी पैसे कोणता वकील घेतो हे सांगावे असाही सवाल सतावर्तेंनी उपस्थित केला. कागदपत्र जप्त केले ते वकालत नामा आहेत. माझ्या प्रकरणात हर्षद मेहता प्रकरणाचा दाखला दिला गेला दुःखद आहे. माझे सासू सासरे स्वातंत्र्य सैनिक आहेत. गाडी घेतली त्याची नोंद आरटीओमध्ये आहे. गाडी घेण्याकरता पैसे दिले ते ॲानलाईन दिल्याचे पुरावे आहेत. गाडी जुनी आहे, 2014 ची जुनी गाडी मी खरेदी केली आहे. नोटा मोजण्याची मशीन 3 हजाराला घेतलीय, आपण मुंबईत राहतो असंही गुणरत्न सदावर्ते म्हणाले. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी कोर्टात आपला अर्ज दाखल करत सदावर्ते यांचा ताबा देण्याची मागणी केली आहे. कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या या अर्जावर थोड्यावेळात सुनावणी होणार आहे. कोर्टातून बाहेर पडताना सदावर्ते सरकारी वकील आणि पत्रकारांकडे पाहून म्हणाले, "मी कष्टकरांच्या वकील आहे… हर्षद मेहता नाही… मी हर्षद मेहता होवू शकत नाही".
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Maharashtra News, Mumbai, Sharad Pawar (Politician), St bus, Strike

पुढील बातम्या