• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • ...अन् सासऱ्याच्या बंदुकीतून सुटली गोळी; मुंबईतील काळजाचा ठोका चुकवणारी घटना

...अन् सासऱ्याच्या बंदुकीतून सुटली गोळी; मुंबईतील काळजाचा ठोका चुकवणारी घटना

सासऱ्याच्या बंदुकीतून अचानक गोळी सुटल्याने अंबरनाथच्या चिखलोली पवार सेक्शन परिसरातील रहिवासी असणारी महिला गंभीर जखमी झाली आहे.

 • Share this:
  अंबरनाथ, 09 ऑक्टोबर: मुंबईनजीक असणाऱ्या अंबरनाथ याठिकाणी एक विचित्र घटना समोर आली आहे. सासऱ्याच्या बंदुकीतून अचानक गोळी सुटल्याने अंबरनाथच्या चिखलोली पवार सेक्शन परिसरातील रहिवासी असणारी महिला गंभीर जखमी (daughter in law injured in gunfire) झाली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांच्या काळजाचाच ठोकाच चुकला आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी त्वरित जखमी महिलेला कल्याणमधील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. महिलेची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत. अनिता पवार असं संबंधित जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे. जखमी अनिता पवार या शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या सासऱ्याचे कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. सासरे गजानन पवार यांनी आपली बंदुक पॅंटच्या खिशाला लावून ही पॅंट भिंतीवर अडकवून ठेवली होती. दरम्यान ही पँट धुण्यासाठी घेत असताना, पँटला लावलेली बंदुक खाली पडली आणि यातून अचानक गोळी सुटून ती थेट सुनबाई अनिता यांच्या पायाला लागली. हेही वाचा-मण्यार चावल्याने भावाचा मृत्यू; अंत्यविधीसाठी आलेल्या बहिणीलाही त्याच सापाचा दंश क्षणार्धात घडलेल्या या घटनेत अनिता यांना स्वत:चा बचाव करायलाही वेळ मिळाला नाही. या धक्कादायक घटनेत सुनबाई अनिता पवार यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. गोळी सुटल्याचा आवाज ऐकून कुटुंबीय देखील घाबरून गेले होते. यानंतर घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने अनिता यांना कल्याण येथील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमी अनिता यांची प्रकृती सध्या स्थिर असून कल्याणस्थित एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: