मुंबई, 22 एप्रिल : देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी आहे. असे असतानाही मुंबईमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माहिम पोलिस ठाण्याच्या ह्द्दीमध्ये हा गोळीबार झाल्याचं समजते. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, माहिम पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार झाला आहे. लॉकडाऊन असतानाही गोळीबार झाल्यानं एकच खळबळ उडाली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकऱणी दोघांना ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक तपासात हा गोळीबार वैयक्तिक वैमनस्यातून झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, याआधी लॉकडाऊन असताना हत्येची घटनाही घडली आहे. शिवडी परिसरात पार्किंगच्या वादातून एका तरुणाची हत्या करण्याची आली होती. शेजाऱ्यांसोबत झालेल्या भांडणात या तरुणावर चाकूने सपासप वार करण्यात आले. शिवडी क्रॉस रोड येथील महापालिका चाळ नंबर 46 च्या गल्लीत पार्किंगवरुन 16 वर्षीय अदनान पटेल या मुलाचे करीम शेख या 35 वर्षीय शेजारील तरुणाशी वाद झाला होता.
हे वाचा : सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी, मुंबईत बरा झालेल्या व्यक्तिची काढली मिरवणूक
राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यातही मुंबई आणि पुण्यात रुग्णांची संख्या जास्त आहे. यामुळे लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी गरजेची असतानाच असे प्रकार समोर धक्कादायक आहेत. याआधी कोरोनामुळे बरा झालेल्या रुग्णाची चक्क मिरवणूक काढल्याचा प्रकारही घडला आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियमही धाब्यावर बसवण्यात आले.
हे वाचा : कोरोनाच्या लढ्यात यश! एकाच कुटुंबातील 6 जणं बरे होऊन परतले घरी, पुन्हा शतकपूर्ती
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.