मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईत गुजराती व्यापाऱ्याचा मराठी पाट्यांना विरोध, शिवसैनिकांनी दुकानासमोरच लावले बॅनर!

मुंबईत गुजराती व्यापाऱ्याचा मराठी पाट्यांना विरोध, शिवसैनिकांनी दुकानासमोरच लावले बॅनर!

राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील सर्व दुकानांवर आता मराठीत ठळक अक्षरांत पाट्या लिहिण्याचे आदेश जाहीर केले आहे.

राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील सर्व दुकानांवर आता मराठीत ठळक अक्षरांत पाट्या लिहिण्याचे आदेश जाहीर केले आहे.

राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील सर्व दुकानांवर आता मराठीत ठळक अक्षरांत पाट्या लिहिण्याचे आदेश जाहीर केले आहे.

मुंबई, 13 जानेवारी : राज्यातील दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Boards on Shop) असल्याच पाहिजे असा आदेश महाविकास आघाडी सरकारने (mva government) जारी केला आहे. पण मुंबई ट्रेडर्स संघटनेच्या अध्यक्षाने (President of Mumbai Traders Association) आपल्या दुकानाला मराठी पाटी लावण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शिवसैनिक (shivsena workers) आता रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईत राडा होण्याची चिन्ह आहे.

राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील सर्व दुकानांवर आता मराठीत ठळक अक्षरांत पाट्या लिहीण्याचे आदेश जाहीर केले आहे. मात्र या आदेशांना मुंबई ट्रेडर्स संघटनेचे अध्यक्ष विरेन शहा याने विरोध करत आदेशांचे पालन करणार नसल्याचं सांगितले आहे.  मुंबई हे मोठे शहर आहे, इथं वेगवेगळ्या भाषेची लोक राहतात. आम्हाला मराठी पाट्या ठेवण्याचे आदेश दिले आहे, पण अनेक भाषांची लोक राहत असल्यामुळे इंग्रजीमध्येच पाट्या आम्ही लावणार आहोत, असं विरेन शहा यांनी सांगितलं आहे.

(SBI कडून मिळेल विना गॅरंटी 20 लाखांपर्यंत लोन, तुम्ही पात्र आहात का?)

विरेन शहा यांच्या या भूमिकेमुळे शिवसैनिक संतापले आहे. संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी थेट विरेन शहा याच्या मालकीच्या रूपम शॉप समोरच मोठे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर महाराष्ट्रातील प्रत्येक दुकानाची पाटी आता मराठीतच लावावी लागणार आहे. दहा कामगारांपेक्षा कमी असलेल्या आस्थापनांना सुद्धा मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे. हे आपले ठाकरे सरकार असा मजकूर छापण्यात आला आहे.

मुंबई पोलीस मुख्यलयासमोरच विरेन शहा यांच्या मालकीचे रूपम शॉप आहे. त्या शॉपच्या शेजारीच असे बँनर शिवसेनेनं लावले आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा दुकानांवर मराठी पाट्या लावण्यावरून वाद निर्माण होताना दिसत आहे.

दुकानांवरील मराठी पाट्यांचं श्रेय फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं - राज ठाकरे

दरम्यान,  महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयमन) अधिनियम, 2017 यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी ट्विट करत हे श्रेय केवळ महाराष्ट्र सैनिकांचं असल्याचं म्हटलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, ह्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये. परंतु 2008, 2009 साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या.

काल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय गेतला. तेव्हा त्याचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांना मन:पूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच असंही राज ठाकरेंनी आपल्या पत्रकात म्हटलं आहे. आणि महाराष्ट्र सरकारचंही अभिनंदन. सरकारला आता मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका, ह्याची अंमबलबजावणी नीट करा.

First published:
top videos