खळबळजनक! दादर स्टेशनवर एक्सप्रेसमध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला महिलेचा मृतदेह

भुज दादर एक्स्प्रेसमध्ये महिलांच्या डब्यात एका महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्यानं खळबळ माजली आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 8, 2018 08:34 AM IST

खळबळजनक! दादर स्टेशनवर एक्सप्रेसमध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला महिलेचा मृतदेह

मुंबई, 08 डिसेंबर : भुज दादर एक्स्प्रेसमध्ये महिलांच्या डब्यात एका महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्यानं खळबळ माजली आहे. दादर इथं महिलांच्या डब्याची तपासणी करत असताना आरपीएफ जवानांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महिलेचा मृतदेह आढळला आणि मोठी खळबळ उडाली.

दाडिया देवी चौधरी असं या महिलेचं नाव असून ती वडाळ्यातल्या आपल्या बहिणीकडे जात होती. सूरत इथून ती ट्रेनमध्ये चढली होती. शुक्रवारी सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान या महिलेचा गळा कापून हत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

आरपीएफ टीमने महिलेचा मृतदेह रेल्वेच्या डब्यातून ताब्यात घेतला असून तो आता शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर आरपीएफने सांगितल्याप्रमाणे महिलेच्या अंगावर अर्धेच कपडे होते. मारेकऱ्यांनी तिला मारल्यानंतर तिचा मृतदेह साडीने झाकून ठेवला असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबई सेंट्रलच्या आरपीएफने या खळबळजनक हत्येचा कसून तपास करण्यास सुरूवात केली आहे. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करताना बोरिवली इथं चार महिला डब्यातून उतरताना दिसत आहे. तर इतर स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत.

हे प्रकरण चोरी आणि हत्येचं असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र यांच्यानुसार मृत महिला दाडिया देवी शंकर चौधरी (40) सूरतहून मुंबईसाठी रवाना झाली होती. महिला एका कपड्याच्या दुकानात काम करते. तिला 2 मुली आणि एक मुलगा असल्याचंही शैलेंद्र यांनी सांगितलं आहे.

Loading...

ज्या ट्रेनमध्ये महिलेचा मृतदेह मिळाला ती ट्रेन सूरतनंतर थेट मुंबईच्या वसई, बोरीवली आणि नंतर दादरला थांबते. आता सीसीटीव्ही फुटेचा अंदाज घ्यायचा झाला तर, या महिलेची हत्या वसई ते दादरच्या दरम्यान झाली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

कारण त्याच दरम्यान, रेल्वेतून काही महिला उतरताना दिसत आहे. जर त्या महिलांनी मृतदेह पाहिला तर त्यांनी याबद्दल पोलिसांना का नाही सांगितलं. या सगळ्यामुळे पोलीस आता या दिशेनेही तपास करत आहेत.


VIDEO : जेव्हा पवार आजोबा नातीच्या गाडीतून घरी जातात


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2018 08:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...