गुजरातमध्ये सेनेच्या सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

गुजरातमध्ये सेनेच्या सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

सेनेनं गुजरातमध्ये १८२ पैकी ४२ मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले. पण आता त्यापैकी सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाल आहे.

  • Share this:

19 डिसेंबर : गुजरात निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेनं उशीरा उडी घेतली. त्यात राज्यात आणि केंद्रात आपली सत्ता असूनही शिवसेना नेहमी विरोधकाची भूमिका बजावताना दिसते आणि म्हणूनच सेनेनं गुजरातमध्ये १८२ पैकी ४२ मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले. पण आता त्यापैकी सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाल आहे.

गुजरात निवडणुकीत शिवसेनेला फक्तं ३३ हजार नऊशे नऊ मतं पडलीत. त्यापैकी फक्तं ११ उमेदवारांनीच हजार मतांचा टप्पा ओलांडला आहे. लिंबायत मतदार संघातील शिवसेना उमेदवार सम्राट पाटील यांनी सर्वाधिक ४ हजार ७५ मतं पडलीत. यावरूनच शिवसेना गुजरातमध्ये किती भुईसपाट झालीय हे दिसून येतं.

यावर 'आता डिपॉझिट वाचवण्यासाठीचं मशिन वापराव लागणार' असा टोला मुंबईच्या भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावला आहे. तर शिवसेनेनं निवडणुकीत जय-पराजय होतच असतात. आम्ही गुजरातमध्ये पुढच्या निवडणुकाही लढू, असा निश्चय शिवसेनेच्या संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

आपला गुजरातमध्ये दारुण पराभव झालेला असतानाही सेनेनं विजयी झालेल्या भाजपवर सामनामधून सडकूण टिका केली आहे.

First published: December 19, 2017, 12:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading