31 डिसेंबरनिमित्त फिरण्यासाठी बाहेर पडत असाल तर थांबा! पर्यटनाबाबत हे आहे नवे नियम

31 डिसेंबरनिमित्त फिरण्यासाठी बाहेर पडत असाल तर थांबा! पर्यटनाबाबत हे आहे नवे नियम

कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेत पर्यटकांना तसंच पर्यटनस्थळांना परवानगी देण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 डिसेंबर : कंटेनमेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळे आणि पर्यटक यांच्यासाठी पर्यटन संचालनालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेत पर्यटकांना तसंच पर्यटनस्थळांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी पर्यटकांना काही सूचनांचंही पालन करावं लागणार आहे.

पर्यटनासाठी घराबाहेर पडाल तेव्हा लक्षात ठेवा हे नियम :

- पर्यटनस्थळांवर मास्क, सोशल डिस्टन्सिंग आदींचे पालन आवश्यक

- गर्दी टाळण्यासाठी शक्यतो सुविधा उपलब्ध असल्यास पर्यटनस्थळांचे ऑनलाईन तिकीट बुकींग करण्याच्या सूचना

- पर्यटनस्थळांवर फक्त लक्षणे विरहीत पर्यटकांनाच परवानगी

- 65 वर्षावरिल ज्येष्ठ नागरीक, गरोदर महिला, 10 वर्षाखालील मुले, गंभीर आजार असणाऱ्या व्यक्ती आदींनी घरीच थांबण्याच्या सूचना

- पर्यटकांनी शक्यतो चलन वापरण्याचे टाळून डिजीटल पेमेंटवर भर द्यावा.

- स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांनी काही निर्बंध, सूचना जारी केलेल्या असतील तर त्या बंधनकारक असतील.

दरम्यान, 31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. विशेषत: मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये देखील अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते त्या दृष्टीने कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे, असंही आवाहन शासनाकडून करण्यात आलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 28, 2020, 6:44 PM IST

ताज्या बातम्या