मुंबईत वर्ल्ड टेंड सेंटरच्या 30व्या मजल्यावरून आत्महत्या

मुंबईत वर्ल्ड टेंड सेंटरच्या 30व्या मजल्यावरून आत्महत्या

मुंबईतील कफ परेड येथील वर्ल्ड टेंड सेंटरच्या 30व्या मजल्यावरुन उडी घेत एका जीएसटी निरिक्षकाने आत्महत्या केली.

  • Share this:

मुंबई, 14 मे: मुंबईतील कफ परेड येथील वर्ल्ड टेंड सेंटरच्या 30व्या मजल्यावरुन उडी घेत एका जीएसटी निरिक्षकाने आत्महत्या केली. हरेंद्र कापडिया असे या आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. कापडिया यांनी सोमवारी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. यासंदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत.

कापडिया गेल्या 3 महिन्यापासून रजेवर होते. रजा झाल्यानंतर ते कार्यालयात रुजू झाले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कापडिया यांनी आजापणासाठी सुट्टी घेतली होती. त्यामुळे आजापणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या घटनेची अपघाती मृ्त्यू अशी नोंद करुन घेतली आहे. या घटनेसंदर्भात अधिक तपास सुरु आहे.

VIDEO: निवडणूक आयोगानं अशा लोकांची तोंड बंद करावीत- संजय राऊत

First published: May 14, 2019, 9:50 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading