जीएसटीबाबत सेनेच्या मागण्या मान्य, 'मातोश्री'वर मसुदा पाठवला

जीएसटीबाबत सेनेच्या मागण्या मान्य, 'मातोश्री'वर मसुदा पाठवला

जीएसटी विधेयकाबाबत शिवसेनेची मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडून पूर्ण करण्यात आलीये.

  • Share this:

09 मे : जीएसटी विधेयकाबाबत शिवसेनेची मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडून पूर्ण करण्यात आलीये. शिवसेनेच्या मागणीनुसार राज्याच्या जीएसटी कायद्यात सुधारणा करण्यात आले आहे आणि सुधारित मसुदा रात्री 'मातोश्री'वर पाठवण्यात आलाय.

अर्थ-राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यामार्फत सुधारित मसुदा सोमवारी रात्री 'मातोश्री'वर पाठवण्यात आलाय. मुंबई महापालिकेला केंद्र सरकारकडून मिळणारा जीएसटीचा निधी कमी असेल तर राज्य सरकार भरपाई देणार आहे.

राज्याकडून दिल्या जाणाऱ्या निधीत दरवर्षी ८ टक्के वाढ करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या मागणीनुसार या बाबी विधेयकात समाविष्ट करण्यात आलेत. मुंबईला जकातीपासून मिळणारं उत्पन्न  बूडू नये म्हणून शिवसेनेने ही भूमिका घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2017 05:12 PM IST

ताज्या बातम्या