'जीएसटी'साठी भाजपकडून सेनेची मनधरणी

'जीएसटी'साठी भाजपकडून सेनेची मनधरणी

जीएसटी विधेयकावर शिवसेनेचं मन वळवण्याचे प्रयत्नं आता भाजपकडून सुरू झालेत. त्यासाठीच आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

  • Share this:

उदय जाधव, मुंबई

08 मे : जीएसटी विधेयकावर शिवसेनेचं मन वळवण्याचे प्रयत्नं आता भाजपकडून सुरू झालेत. त्यासाठीच आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पण या भेटी नंतरही ठोस काही निर्णय झाला नाही. त्यामुळे येणाऱ्या जीएसटी विधेयकाच्या विशेष अधिवेशनात, शिवसेनेच्या भूमिकेवरच जीएसटी विधेयक मंजूर होणार का ? यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

जीएसटी विधेयकावर शिवसेनेची आक्रमक भूमिका, उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली. आणि त्यानंतर भाजपने शिवसेनेचं मन वळवण्यासाठी, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना 'मातोश्री'वर शिष्टाई करण्यासाठी पाठवलं.

उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत अर्थमंत्र्यांनी जीएसटी विधेयका संदर्भात प्रेझेन्टेंसनही केलं. पण शिवसेनेनं महापालिकांची आर्थिक कोंडी दूर करण्यासाठी, जीएसटी नुकसान भरपाई विधेयक आणावं, अशी मागणी शिवसेनेनं केलीय.

 जीएसटी विधेयकाला विरोध का ?

१) जीएसटीमुळे मुंबई महापालिकेचा ७००० कोटी रुपयांचा महसूल बुडणार

२) त्यामुळे मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा जीएसटीला  विरोध

३) अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी मुंबई महापालिकेला दर महिन्याला ६५० कोटी रुपये देऊ असं आश्वासन दिलं आहे.

४) पण तरीही शिवसेनेचा विरोध कायम. कारण ६५० कोटी रुपये बीएमसीची तूट भरून काढू शकत नाही.

५) राज्यात जीएसटी विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपला शिवसेनेचीच मदत लागणार आहे. त्यामुळे भाजपने शिष्टाई सुरू केली आहे.

लोकसभा आणि राज्यसभेत भाजपने जीएसटी विधेयक मंजूर करून घेतलं. आणि येणाऱ्या १ जुलैपासून त्याची अंमलबजावणी देखील देशभरात सुरू होणार आहे. त्यासाठी या विधेयकाला राज्यातील विधीमंडळाचीही मंजूरी आवश्यक आहे. आणि त्यासाठी राज्यातील भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेची मनधरणी सुरू केलीय. त्यामुळे येणाऱ्या विशेष अधिवेशनात शिवसेनेच्या भूमिकेवर सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

First Published: May 8, 2017 05:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading