मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /सुसाट वेगाने धावली बस; 50 बंडखोर आमदारांसाठी मुंबई विमानतळ ते हॉटेल ताजपर्यंत विशेष कॉरिडोर 

सुसाट वेगाने धावली बस; 50 बंडखोर आमदारांसाठी मुंबई विमानतळ ते हॉटेल ताजपर्यंत विशेष कॉरिडोर 

सर्वसाधारणपणे पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान इतकी सुरक्षा घेतली जाते. पहिल्यांदाच आमदारांसाठी इतका मोठा ताफा आणि सुरक्षा यंत्रणा राबवण्यात आली होती.

सर्वसाधारणपणे पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान इतकी सुरक्षा घेतली जाते. पहिल्यांदाच आमदारांसाठी इतका मोठा ताफा आणि सुरक्षा यंत्रणा राबवण्यात आली होती.

सर्वसाधारणपणे पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान इतकी सुरक्षा घेतली जाते. पहिल्यांदाच आमदारांसाठी इतका मोठा ताफा आणि सुरक्षा यंत्रणा राबवण्यात आली होती.

मुंबई, 2 जुलै : काही वेळापूर्वी बंडखोर 50 आमदार मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर पुढील काही मिनिटात त्यांना बसने हॉटेल ताज प्रेसिडेंटच्या दिशेने रवाना करण्यात आलं. त्यानंतर मुंबई विमानतळ ते हॉटेल ताजपर्यंतचा संपूर्ण भाग विशेष कॉरिडोर करण्यात आला होता. यावेळी आमदारांची बस सुसाट वेगाने हॉटेलच्या दिशेने निघाली. सुरक्षेच्या दृष्टीने विचार करता त्यांच्या मार्गात एकही गाडी नव्हती. सर्वसाधारणपणे पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान इतकी सुरक्षा दिली जाते. पहिल्यांदाच आमदारांसाठी इतका मोठा ताफा आणि सुरक्षा यंत्रणा राबवण्यात आली होती.

आमदारांना वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून मुंबई विमानतळ ते हॉटेल ताज प्रेसिडेंटपर्यंत विशेष कॉरिडोर लावण्यात आला होता. सर्वसाधारणपणे 9 दरम्यान  मुंबईत भयंकर वाहतुकीचा सामना करावा लागतो. मात्र आमदारांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीच्या वेळेतही विशेष कॉरिडोर करण्यात आला. याशिवाय आमदारांच्या बससोबत पोलिसांचा विशेष ताफा होता.

आमदारांसाठी मोठी सुरक्षा...

-संपूर्ण सी-लिंकवरील वाहतूक थांबवली.

-मुंबई विमानतळ ते आमदारांसाठी ग्रीन कॉरिडोर

-वेस्टन एक्सप्रेस वे वरील एक लेन केली रिकामी

दरम्यान बंडखोर आमदार मुंबई विमानतळावर उतल्याचं वृत्त कळताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हॉटेल ताज प्रेसिडेंटकडे रवाना झाल्याचं समोर आलं आहे. बंडखोर आमदारांचं मुंबईत कसं स्वागत होईल, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सर्व आमदार हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर शिंदे गट आणि फडणवीसांचा बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.

First published:

Tags: Airport, BJP, Mla, Mumbai, Shivsena