Home /News /mumbai /

कोरोनाबाबत महाराष्ट्राला मोठा दिलासा, गेल्या काही महिन्यांतील सर्वात कमी मृत्यूंची नोंद

कोरोनाबाबत महाराष्ट्राला मोठा दिलासा, गेल्या काही महिन्यांतील सर्वात कमी मृत्यूंची नोंद

सर्वात दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज केवळ 30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही महिन्यांमधील ही सर्वात कमी संख्या आहे.

मुंबई, 24 नोव्हेंबर : महाराष्ट्रात आजही कोरोना रुग्णांचा आकडा 5 हजारांहून अधिक आढळून आला आहे. राज्यात आज 5 हजार 400 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तसंच साडेतीन हजार रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यामध्ये सर्वात दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज केवळ 30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही महिन्यांमधील ही सर्वात कमी संख्या आहे. दुसरीकडे, पुणे शहरात आज दिवसभरात 416 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर 218 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. पुण्यात कोरोनाबाधित 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील 3 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. शहरात एकूण 419 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 252 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 लाख 67 हजार 604 इतकी आहे. राज्याला दिलासा देणारी बातमी, कोरोना लशीसाठी टास्क फोर्सची निर्मिती कोविड लस प्रभावीपणे निर्माण करून तिचे वितरण करणे ती देण्याबाबतचा प्राधान्यक्रम निश्चित करणे आणि त्या लसीची किंमत व प्रमाण ठरविण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. य़ा टास्क फोर्समध्ये वित्त, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, आरोग्य सेवा आयुक्त, वैद्यकीय शिक्षण संचालक, डॉ. शशांक जोशी त्याचप्रमाणे जे.जे. आणि केईएम रुग्णालयाच्या प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषध विभागांचे प्रमुख सदस्य असतील. या टास्क फोर्सने लस साठवण आणि वितरण व्यवस्थेसाठी शीत साखळी ठरविणे व लसीकरणाच्य शेवटच्या टप्प्यांपर्यंत आवश्यक बाबी तसेच किंमत ठरविणे अपेक्षित आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus

पुढील बातम्या