Home /News /mumbai /

पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद निवडणुकीबाबत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरेना!

पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद निवडणुकीबाबत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरेना!

तर दुसरीकडे पुणे पदवीधर निवडणूक राष्ट्रवादी लढणार आहे. औरंगाबाद आणि नागपूर पदवीधर बाबत महाविकास आघाडीत तोडगा निघण्याची शक्यता आहे.

मुंबई, 09 नोव्हेंबर : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे स्थानिक निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र आल्याचे पाहण्यास मिळाले आहे. पण, पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद  निवडणुकीवरून महाविकास आघाडीत अजूनही रस्सीखेच सुरूच आहे. विधानपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहे. पण अजूनही जागांचे वाटपाबाबत कोणताही निर्णय ठरलेला नाही. 12 तारखेपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. पण अजूनही पडद्याआड कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे आता महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत नेत्यांमध्ये चर्चा करून लवकरच तोडगा काढण्याची शक्यता आहे. VIDEO : सराफाची नजर चुकवून महिलेनं लंपास केली चैन, चोरीचा थरार CCTVमध्ये कैद अमरावती शिक्षक मतदारसंघातील विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांना शिवसेनेकडून उमेदवारी अपेक्षा आहे.  पण त्यांच्या उमेदवारीला काँग्रेसने विरोध केला आहे.  स्थानिक काँग्रेसकडून ही जागा काँग्रेसच्या पारड्यात यावी अशी मागणी केली जात आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातील जागा काँग्रेसला हवी आहे. याआधी ही जागा आघाडी सरकार असताना  काँग्रेसकडे होती. या जागेवर दत्तात्रेय सावंत हे आता आमदार आहेत. दत्तात्रेय सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून  महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा अशी मागणी सावंत यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. 'या' हॉट अभिनेत्रीला डेट करतोय बर्थ डे बॉय पृथ्वी शॉ, पाहा PHOTO तर दुसरीकडे पुणे पदवीधर निवडणूक राष्ट्रवादी लढणार आहे. औरंगाबाद आणि नागपूर पदवीधर बाबत महाविकास आघाडीत तोडगा निघण्याची शक्यता आहे.  नागपूर पदवीधर काँग्रेस लढवण्याची शक्यता आहे तर औरंगाबाद  पदवीधर सतीश चव्हाण राष्ट्रवादीकडून लढवणार आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या