विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघाच्या 4 जागांसाठी आज मतदान

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघाच्या 4 जागांसाठी आज मतदान

विधान परिषदेच्या पदवीधर तसंच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी 7 ते सायंकाळी 5 दरम्यान मतदान सुरू झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 25 जून : विधान परिषदेच्या पदवीधर तसंच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी 7 ते सायंकाळी 5 दरम्यान मतदान सुरू झालं आहे. विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदान होणार आहे. यातील मुंबई आणि कोकण पदवीधर मतदासंघातील निवडणूक सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे.

शिवसेनेकडून विलास पोतनीस, भाजपकडून अमितकुमार मेहता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले शेकापचे उमेदवार राजेंद्र कोरडे, नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाचे उमेदवार राजेंद्र बंडगर अशी बहुरंगी निवडणुक आहे.

मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपकडून अनिल देशमुख, शिवसेनेचे शिवाजी शेंडगे हे निवडणूक रिंगणात आहेत. तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार आहे.

भाजपनं "राष्ट्रवादी'तून आलेल्या निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिलीय. तर राष्ट्रवादीकडून ठाण्यातील नगरसेवक नजीब मुल्लांना उमेदवारी दिलीय. शिवसेनेनं ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना उमेदवारी दिलीय.

नाशिक शिक्षक मतदारसंघात भाजपचे अनिकेत पाटील, शिवसेनेचे किशोर दराडे, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, टीडीएफचे भाऊसाहेब नारायण कचरे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा असलेले संदीप बेडसे यांच्यात प्रमुख लढत होत आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत कोणकोणते उमेदवार रिंगणात आहेत त्यावर एक नजर टाकूयात

मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक

विलास पोतनीस - शिवसेना

अमितकुमार मेहता - भाजप

राजेंद्र कोरडे - शेकाप, (काँग्रेस,राष्ट्रवादीचा पाठिंबा)

राजेंद्र बंडगर - स्वाभिमान पक्ष

मुंबई शिक्षक मतदारसंघ

अनिल देशमुख - भाजप

शिवाजी शेंडगे - शिवसेना

कोकण पदवीधर मतदारसंघ

निरंजन डावखरे - भाजप

नजीब मुल्ला - राष्ट्रवादी

संजय मोरे - शिवसेना

कोकण पदवीधरसाठी पक्ष आणि उमेदवार

निरंजन डावखरे - भाजप

नजीब मुल्ला - राष्ट्रवादी काँग्रेस

संजय मोरे - शिवसेना

नाशिक शिक्षक मतदारसंघ

अनिकेत पाटील - भाजप

किशोर दराडे - शिवसेना

भाऊसाहेब कचरे - टीडीएफ

संदीप बेडसे - (काँग्रेस, राष्ट्रवादी पाठिंबा)

एकूण मतदारसंघ मतदार संख्या

मुंबई पदवीधर - 70 हजार 636 मतदार

कोकण पदवीधर - 1 लाख 4 हजार 264 मतदार

मुंबई शिक्षक - 10 हजार 141 मतदार

नाशिक शिक्षक - 53 हजार 892 मतदार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2018 09:46 AM IST

ताज्या बातम्या