आमदारांसाठी सरकारची धावपळ, घाटकोपर दुर्घटना पीडित वाऱ्यावर!

आमदारांचा तातडीनं विचार करणारं सरकार सर्वसामान्यांकडे मात्र दुर्लक्ष करतंय.

Sonali Deshpande | Updated On: Aug 1, 2017 02:18 PM IST

आमदारांसाठी सरकारची धावपळ, घाटकोपर दुर्घटना पीडित वाऱ्यावर!

मुंबई, 01 आॅगस्ट, प्रतिनिधी : सामान्य माणूस आणि व्हीआयपी यांच्याबद्दलची सरकारची वेगवेगळी वागणूक पुन्हा एकदा समोर आलीय. दक्षिण मुंबईतल्या मनोरा आमदार निवासात काल किरकोळ पडझड झाली. आणि आज सरकारनं आमदारांच्या काळजीपोटी तात्काळ वर्तमानपत्रात जाहिरात दिली. दक्षिण-मध्य मुंबईत फ्लॅट भाड्याने हवेत, अशी ही जाहिरात आहे. 400 ते 450 स्क्वेअर फुटांचे 175 सुसज्ज फ्लॅट्स सरकारला आमदारांसाठी हवेत.

दुसरीकडे घाटकोपरमधल्या सिद्धीसाई इमारत दुर्घटनेतले रहिवासी पाच दिवस झाले तरी अजून उघड्यावर आहेत. दोन दिवसांत निवाऱ्याची सोय करू, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. पण ते वाऱ्यावरच आहे. इमारत दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 17 जणांचा मृत्यू झाला आहे. 18 कुटुंब रस्त्यावर आलीयत. घाटकोपरच्या एलबीएस रोडवर दामोदर पार्क येथे असलेली साईदर्शन ही चार मजली इमारत 25 जुलै रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली.

आमदारांचा तातडीनं विचार करणारं सरकार सर्वसामान्यांकडे मात्र दुर्लक्ष करतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 1, 2017 02:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close